धर्मपरिवर्तनासाठी जबरदस्ती ; युवतीची आत्महत्या



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - आमच्या कास्टमध्ये टिकली लावलेली व लिपस्टीक लावलेली चालत नाही, असे म्हणून व त्यावरून भांडणे करून तसेच लग्न व धर्म परिवर्तनासाठी बळजबरी केल्याने अल्पवयीने युवतीने आत्महत्या करण्याची घटना नगरमध्ये घडली. पोलिसांनी याप्रकरणी पुणे येथील सोहेल शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


याप्रकरणी संबंधित युवतीच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यांची दहावीत शिकणारी मुलगी पुण्याला मामाकडे गेली असता मामाच्या विवाहित मुलीकडे गेली होती व तेथे तिची सोहेलशी ओळख झाली. तिच्याशी लग्न लावून दिले नाही तर आख्खे नगर पेटवून देईल, अशी धमकी त्याने मुलीच्या वडीलांना फोनवरून दिली होती. तसेच मुलीच्या मावस बहिणीच्या लग्नात मावसभावाने काढलेले फोटो सोशल मिडियात टाकल्याने त्यालाही व मुलीलाही त्याने शिवीगाळ केली होती. तो त्रास देत असल्याची तक्रार या मुलीने कुटुंबातील काही सदस्यांकडे केली होती व या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात दिली आहे. पोलिस या प्रकरणी तपास करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post