गौरी गडाख यांची गळफास घेऊन आत्महत्या; अहवालातून स्पष्ट

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोस्टमॉर्टमध्ये निष्पन्न झाले आहे. शनिवारी रात्री अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात त्या मृतावस्थेत आढळल्या होत्या.


ज्येष्ठ राजकीय नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा आणि आणि यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख (वय 35) यांचे शनिवारी सायंकाळी यशवंत कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरी संशयास्पदरीत्या निधन झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, गौरी प्रशांत गडाख यांनी गळफास घेतल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, पोलिस पुढीत तपास करत आहेत. गौरी गडाख यांच्या आत्महत्येने जिल्ह्यात शांतता पसरली आहे. त्यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post