माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी आज भारतात दाखल झाली. गुजरातमधील जामनगर एअरबेसवर ही विमानं उतरली. यापूर्वी पंजाबमधील अंबालामध्ये पाच राफेल विमानांची पहिली बॅच दाखल झाली होती. भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानं खरेदी केली आहेत. ती टप्प्याटप्प्याने भारतात दाखल होत आहेत. आत्तापर्यंत एकूण आठ विमानं भारतात आली आहेत.
२९ जुलै रोजी पाच राफेल विमानांचा पहिला जत्था अंबाला एअरबेसवर दाखल झाला होता. अबुधाबीतील अल ढफरा एअरबेसवर एक थांबा घेत ही विमानं भारतात दाखल झाली होती. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी एका औपचारिक कार्यक्रमात ही विमान भारतीय हवाई दलात दाखल झाली होती.
दरम्यान, हवाई दलाच्या माहितीनुसार आज आलेल्या तीन राफेल विमानांनी मध्ये कुठलाही थांबा घेतला नाही. प्रवासादरम्यान फ्रान्सच्या आणि भारताच्या विमानांद्वारे या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. हवाई दलाला प्रत्येक दोन महिन्यांनंतर तीन ते चार राफेल विमानं दिली जाणार आहेत.
Post a Comment