'देशपांडे दवाखान्‍याने आरोग्‍य सेवेत जनतेचा विश्‍वास निर्माण केला'

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर -  अहमदनगर महानगरपालिका ही सेवाभावी संस्‍था आहे. या संस्‍थेच्‍या माध्‍यमातून नागरिकांचे विविध प्रश्‍न सोडविण्‍याचे काम केले जाते. याच धर्तीवर मनपाच्‍या वतीने कै.बाळासाहेब देशपांडे दवाखान्‍याने आजपर्यत चांगली वैद्यकिय सेवा देवून राज्‍यामध्‍ये नांवलौकिक मिळाला आहे. आजही मोठया प्रमाणात महिला प्रसुतीसाठी देशपांडे रूग्‍णालयामध्‍ये येत आहे. विविध अडचणींना सामोरे जावूनही आपले डॉक्‍टर, नर्स व कर्मचारी चांगल्‍याप्रकारे सेवा देण्‍याचे काम करित आहेत. रूग्‍णांना चांगली सेवा देण्‍यासाठी मनपा कै.बा.देशपांडे दवाखान्‍याला अधिक मदत करिल. कमी स्‍टाफवर दवाखान्‍याची सेवा सुरू आहे. तरी दवाखान्‍याला पूर्ण क्षमतेने स्‍टाफ देण्‍याच्‍या सुचना आस्‍थापना प्रमुख यांना केल्‍या आहे.  दवाखान्‍यामध्‍ये एचआयव्‍ही व कावीळ पॉझीटीव्‍ह रूग्‍ण प्रसुतीसाठी येत असतात. यासाठी लवकरच दुसरे ऑपरेशन थिएटर  सुरू करण्‍यासाठी मदत करू. कै.बा.देशपांडे दवाखाना रूग्‍णांना 24 तास सेवा देण्‍याचे काम करित असून 7 ते 8 नॉर्मल प्रसुती होतात व 4 ते 5 सिझेरीयन होतात व दैनंदिन तपासणीसाठी सुमारे 100 महिला येतात. यासाठी जास्‍तीत जास्‍त रूग्‍णांना सेवा देण्‍यासाठी बेड वाढविण्‍याचे आदेश मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी दिले.

      बाळासाहेब देशपांडे दवाखाना येथील विविध सेवा सुविधा सक्षमीकरण व बळकटीकरण करण्‍यासाठीच्‍या बैठकीत  मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे बोलत होते. यावेळी मा.आयुक्‍त श्री.श्रीकांत मायकलवार,  उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे ,स्‍थायी समितीचे सभापती मा.श्री.मनोज कोतकर, महिला बाल कल्‍याण समितीच्‍या सभापती मा.सौ.लताताई शेळके, उपसभापती मा.सौ.सुवर्णाताई गेणाप्‍पा, आरोग्‍याधिकारी डॉ.अनिल बोरगे, शहर अभियंता श्री.सुरेश इथापे, वैद्यकिय आरोग्‍याधिकारी डॉ.सतिष राजूरकर, आस्‍थापना प्रमुख श्री.मेहेर लहारे, अभियंता श्री.श्रीकांत निंबाळकर, इलेक्‍ट्रीक विभाग प्रमुख श्री.राजेंद्र मेहेत्रे , अग्निशमन विभाग प्रमुख श्री.शंकर मिसाळ, वैद्यकिय अधिकारी डॉ.शिल्‍पा पाठक आदी उपस्थित होते.

      कै.बा.देशपांडे यानी आपली ही जागा सुमारे 60 वर्षापूर्वी तत्‍कालीन नगरपालिकेकडे हस्‍तांतरीत केली.  त्‍यामुळे ही इमारत जुनी झाली असून तीची डागडुजी ,दुरूस्‍ती व रंगरंगोटी करणे गरजेचे आहे. पूर्ण क्षमतेने सुविधा देवून नागरिकांना अधिकाधिक चांगल्‍या दर्जेच्‍या आरोग्‍य सेवा देण्‍यासाठी मनपाने प्रयत्‍न करावे. नागरिकांचा जो विश्‍वास या बाळासाहेब देशपांडे दवाखान्‍यावर आहे त्‍या विश्‍वासाला आपण कोणीही तडा जावू न देता काम करावे. लाईटचा प्रश्‍न वारंवार निर्माण होत असल्‍यामुळे स्‍वतंत्र डीपी बसविण्‍याचे काम सुरू आहे. असे मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्‍हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post