माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन - कोरोना लस विकसित करण्यासाठी अमेरिकन औषधनिर्माण कंपनी फायजर जोरदार प्रयत्न करत आहे. फायजर ही लस जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित करत आहे. यातच आता या कंपनेने निर्माण केलेल्या करोना प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. फायजरने विकसित केलेली लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याची माहिती समोर आली आली आहे.
दरम्यान, अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाण झाला आहे. त्यामुळे या देशातील शास्त्रज्ञ कोरोनावरील प्रतिबंधक लस शोधण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. यातच आता एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. सोमवारी फायजर कंपनीचे फायजरचे अध्यक्ष आणि सीईओ अल्बर्ट बोर्ला याबाबत महत्त्वाची माहिती दिली. बोर्ला म्हणाले की, प्राथमिक निष्कर्षानुसार लशीचा पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांत आणि दुसऱ्या डोसनंतर सात दिवसांमध्ये संबंधित व्यक्तिंमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या पहिल्या भागात ही लस करोनाला अटकाव करण्यास प्रभावी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ऑक्टोबर अखेरीस अथवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष समोर येतील असे यापूर्वी फायजर कंपनीने सांगितले होते. तर अमेरिकेत या वर्षाच्या शेवटपर्यंत ४० दशलक्ष डोस उपलब्ध करून देण्याची तयारी फायजर कंपनीने दर्शवली आहे. अल्बर्ट बोर्ला यांनी यापूर्वी सांगितले होते की, चाचणी अपेक्षेनुसार सुरू राहिली आणि लशीला प्राधिकरणाने मंजुरी दिल्यास आम्ही अमेरिकेत लस पुरवठा सुरू करण्यास सक्षम आहे.
Post a Comment