माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स (टीआरपी) फेरफार घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या वितरण विभागाचे प्रमुख घनश्याम दिलीपकुमार सिंग याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी ठाण्यातून बेड्या ठोकल्या. रिपब्लिक टीव्हीशी संबंधित ही पहिलीच अटक असून टीआरपी घोटाळा प्रकरणातील 12 वी अटक आहे.
प्रमुख सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विशाल भंडारी याच्यासह बोमपेली मिस्त्री, नारायण शर्मा, शिरीष पत्तनशेट्टी, विनय त्रिपाठी, उमेश मिश्रा, रामजी वर्मा, दिनेशकुमार विश्वकर्मा, हरीष पाटील, अभिषेक कोलवडे उर्फ अजित उर्फ अमित उर्फ महाडिक आणि आशीष चौधरी यांना अटक केली आहे.
ठाण्यातून अटक करण्यात आलेला सिंग हा यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपी कोलवडे याला दर महिन्याला 15 लाख रुपये पुरवत होता. तसेच तो क्रिस्टल ब्रॉडकास्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा भागीदार आरोपी चौधरी याच्या संपर्कात आला. सिंग याने रिपब्लिकच्या टीआरपीसाठी जानेवारी ते जुलै या काळात महिन्याला 15 लाख रुपये दिले होते. कोलावडे याच्या चौकशीतून ही बाब समोर येताच, गुन्हे शाखेने ठाणे येथून सिंग याला अटक केली.
Post a Comment