मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात

 


माय अहमदनगर वेब टीम

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला. सातारा (कलेढोन) येथून मुंबई (परळ) येथे जात असलेल्या एसटी बस (क्रमांक एमएच १४ – बीटी ४६९७) याला अनोळखी कंटेनरने उजव्या बाजूने मागून धड़क दिली. पनवेल हद्दीजवळ झालेल्या या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून चालकासह १६ जण जखमी झाले आहेत.

असणाऱ्या कंटेनरने एसटी बसचा उजव्या बाजूकडील पत्रा कापत जबर धडक दिल्याने उजव्याबाजूकडील आसनावर बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले. आयआरबी कंपनीचे मदतकार्य वेळीच पोहोचल्याने सुरक्षितरित्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महामार्ग वाहतूक पोलीस संबंधित कंटेनरचा शोध घेत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post