माय अहमदनगर वेब टीम
राजधानी दिल्लीत प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र प्रशासन आणि सरकारच्या नियमांना धाब्यावर बसवत दिल्लीतील काही परिसरात मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवण्यात आले. वाढतं प्रदूषण आणि त्यामुळे वाढणारा करोनाचा धोका यासोबतच शनिवारी नियम डावलून फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे दिल्लीची हवा जास्तच प्रदुषित झाली आहे.
दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने दिलेल्या माहितीनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक शनिवारी रात्री ४१४ वरुन थेट ४८१ वर पोहचा होता. हे प्रमाण असंच वाढलं तर दिल्लीकरांना धोका निर्माण होऊ शकतो. प्रदूषण आणि करोनाचे वाढते रुग्ण यामुळे दिल्लीत चिंतेचं वातावरण आहे.
Post a Comment