दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयने केली ‘राम सेतू’ या नव्या चित्रपटाची घोषणा

 


माय अहमदनगर वेब टीम

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा नुकताच लक्ष्मी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता अक्षयने दिवाळीच्या मुहूर्तावर नव्या चित्रपटाची घोषणा केली असून चित्रपटातील फर्स्ट लूक देखील शेअर केला आहे.

अक्षयच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘राम सेतू’ आहे. या चित्रपटात अक्षय मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘राम सेतू’ चित्रपटाची घोषणा करत फर्स्ट लूक शेअर केला आहे.


‘राम सेतू’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अक्षयने राखाडी रंगाचा शर्ट परिधान केला असून त्यावर काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तसेच त्याने चष्मा लावला आहे. अक्षयचा हा वेगळा लूक पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार आहेत. त्यांनी या पूर्वी अक्षयसोबत ‘मिशन मंगल’ चित्रपटात काम केले आहे. आता या चित्रपटात अक्षयसोबत आणखी कोणते कलाकार दिसणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post