माय अहमदनगर वेब टीम
हेेल्थ डोेस्क - कोणताही चटकदार पदार्थ करायचा असेल तर त्यावर कढीपत्त्याची फोडणी ही हवीच. त्यामुळे बऱ्याच गृहिणी स्वयंपाक करताना भाजी, आमटीमध्ये कढीपत्त्याच्या पानांचा वापर करतात. कढीपत्त्यामुळे जशी जेवण्याची चव वाढते. त्याचप्रमाणे तो शरीरासाठीदेखील तितकाच गुणकारी आहे. त्यामुळे कढीपत्ता खाण्याचे १० गुणकारी फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
१. भूक लागत नसल्यास आहारात कढीपत्त्याच्या पानांचा समावेश करावा. कढीपत्त्यामुळे भूक लागते.
२. पोटात येणारा मुरडा थांबतो.
३. जंत झाल्यास कढीपत्ता गुणकारी.
४. मूळव्याधीतून रक्त पडत असेल तर कढीपत्त्याच्या पानांचा काढा बनवून तो प्यायल्यास रक्त पडण्याचे थांबते.
५. हिरड्या मजबूत होतात.
६. एखाद्या कीटकाने चावल्यानंतर सूज आल्यास त्यावर कढीपत्त्याची पाने वाटून लावावीत.
७. जखमा लवकर भरुन निघतात.
८. शरीरावर खाज येत असल्यास कढीपत्त्याच्या पानांचा लेप लावावा.
९. रक्तशुद्ध होते.
१०. केस गळती, केसात कोंडा होणे यावर कढीपत्ता फायदेशीर आहे.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
Post a Comment