'करोनाची RT-PCR चाचणी ४०० रुपयांत व्हावी'; SC ने केंद्राकडून मागितले उत्तर




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने करोनाच्या RTPCR चाचणीचे दर ठरवण्यासाठी केंद्र, राज्यसरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस जारी केली आहे. खरे तर, देशात होत असलेल्या RTPCR चाचणीचा दर ४०० रुपये इतका करण्यात यावा, अशी मागणी करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. यामुळे करोनाच्या चाचण्यांमध्ये वाढ होऊन लोकांना त्याचा लाभ होईल, असे याचिकेत म्हटले आहे.


ही याचिका वकील अजय अग्रवाल यांनी दाखल केली आहे. देशात RTPCR चाचणीचे दर वेगवेगळे आहेत. संपूर्ण देशात करोनाच्या RTPCR चाचणीचे दर समान ठेवणे आवश्यक आहे, असे अग्रवाल यांनी आपला मुद्दा मांडताना म्हटले. त्यावर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने केंद्र, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांकडून दोन आठवड्यांमध्ये उत्तर मागितले आहे.

देशाची राजधानी दिल्ली येथे करोनाचा वाढता संसर्ग पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी RTPCR मोबाइल टेस्टिंग लॅब सुरू केली होती. करोना चाचणीसाठी आयसीएमआरने देशात स्पाइस जेटच्या स्पाइस हेल्थसोहत खासगी भागीदारी करत ही लॅब सुरू केली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post