माय अहमदनगर वेब टीम
शनिवार, ०७ नोव्हेंबर २०२०. चंद्र आपलेच स्वामीत्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करेल. काही राशीच्या व्यक्तींना बोलण्यात गोडवा आणावा लागेल. तर काही राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात उत्तम लाभ मिळू शकतील. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकेल? जाणून घेऊया...
आजचे मराठी पंचांग : शनिवार, ०७ नोव्हेंबर २०२०
मेष : जोडीदाराचे सहकार्य व सानिध्य प्राप्त होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. राशी स्वामी मंगळ, राहु, चंद्र यांचा प्रामुख्याने प्रभाव राहील. बोलण्यात गोडवा आणण्याची कला आत्मसाद करणे हिताचे ठरेल. मुलांबद्दलच्या चिंतेत भर पडू शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात नातेवाईक किंवा प्रियजनांची भेट होण्याचे योग. हास्य-विनोद, मौज-मजेत सायंकाळ व्यतीत होईल. आपल्या चांगल्या वर्तणुकीमुळे लोकांकडून सन्मान होईल. त्यातूनच समाधान मिळेल.
वृषभ : मानसिक शांतता व समाधान लाभेल. पद, प्रतिष्ठा वाढेल. राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना लाभदायक दिवस. प्रयत्न यशकारक ठरतील. शासनाकडून अपेक्षित सहकार्य लाभू शकेल. मुलांबद्दलची चिंता दूर होऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. अति तिखट पदार्थ टाळा.
मिथुन : मौल्यवान वस्तू गहाळ होण्याचे संकेत. दिवसाचा उत्तरार्ध उत्साहवर्धक असेल. मुलांना स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळाल्याचा आनंद होईल. मन प्रसन्न राहील. प्रलंबित कामे सुलभतेने मार्गी लागू शकतील. एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. नोकरीमध्ये लोकांशी बोलताना विचार पक्के ठेवा. आपले मुद्दे ठामपणे मांडा.
कर्क : मान, सन्मान प्राप्त होतील. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. राशी स्वामी चंद्राच्या कृपादृष्टीमुळे संपत्तीतून लाभ मिळू शकेल. मुलांच्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडाल. प्रवास सुखद आणि लाभदायक ठरतील. आजिविकेच्या क्षेत्रात प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरामध्ये आनंदी वातावरण राहील.
सिंह : दिनक्रम व्यस्त राहील. नेत्र विकाराचा त्रास संभवतो. प्रकृती जपा. मिळकतीचे नवे स्रोत उपलब्ध होऊ शकतील. बोलण्याची माधुर्य, गोडवा मान, सन्मान प्राप्त करून देऊ शकतील. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यशकारक दिवस. दिवसाच्या उत्तरार्धात धावपळ संभवते. विरोधक, हितशत्रू परास्त होतील. आपल्या मनाप्रमाणे कामे मार्गी लागतील. नातेवाईकांचा सल्ला उपयोगी पडेल.
कन्या : भाग्याची साथ मिळेल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. राशी स्वामी बुधच्या शुभदृष्टीमुळे व्यापारी वर्गाला प्रयत्नांमध्ये अकल्पनीय यशप्राप्ती होऊ शकेल. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. कायदेशीर प्रकरणांमध्ये सकारात्मक वार्ता मिळू शकतील. चांगल्या गोष्टीसाठी खर्च झालेले पैसे कीर्ती वृद्धिंगत करतील. जवळच्या नातेवाईकांशी गप्पा होतील. खेळ-कलेत लोकांकडून वाहवा होईल.
तुळ : कौटुंबिक वातावरण सुखद व आनंदी राहील. विरोधक परास्त होतील. दिवसाची सुरुवात सकारात्मक असेल. कुटुंबातील सदस्यांशी असलेले नाते दृढ होईल. धनलाभाचे योग संभवतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता. मन प्रसन्न होईल. प्रवास संभवतात. घरातील व्यक्तींचे बोलणे जास्ती मनाला लावून घेऊ नका. खेळात प्राविण्य मिळवाल.
वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतील. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत. प्रकृतीबाबत कुठेही तडजोड करू नका. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल असेल. जोडीदाराच्या मताचा आदर करा. समाजात मानसन्मान मिळेल.
धनु : कार्यक्षेत्रात कौतुक, प्रशंसा होईल. अचानक भेटवस्तू मिळण्याचे योग. दिवसभरात काही ना काही लाभाच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. सासरच्या मंडळींकडून धनलाभाचे योग. दिवसाच्या उत्तरार्धात सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. हातून धार्मिक वाचन लिखाण होईल. अति तिखट पदार्थांचे सेवन टाळा.
मकर : कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नये. प्रयत्न यशकारक ठरतील. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल. आजिविका क्षेत्रात लाभ मिळू शकतील. कार्यालयातील सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. आपले सामाजिक काम व्यवस्थित हाताळा.
कुंभ : विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. सावधगिरीने व्यवहार करावेत. मोसमी आजार त्रस्त करू शकतात. प्रकृती जपा. कोणताही वाद कटाक्
Post a Comment