वयाच्या तिशीनंतर देखील राहायचं असेल फिट तर ‘या’ पदार्थांपासून ठेवा चार हाताचं अंतर!


 

माय अहमदनगर वेब टीम

वयानुसार माणसाच्या शरीरात विविध बदल होत राहतात. जस जसं वय वाढत जातं तस तसं प्रत्येक माणसावरील जबाबदा-यांमध्ये वाढ होत जाते व त्यानुसार आपल्या वागण्यात, कामात काही बदल करावे लागतात. तसं तर आपण लगेचच लाईफस्टाइलमध्ये बदल करत नाही आणि जे काही सुरु आहे तसंच ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. पण असं करणं आरोग्यासाठी योग्य नसतं. कारण वेळेनुसार लाईफस्टाईलमध्ये बदल करणं अनिवार्य असतं. 

वयानुसार आपल्या हेल्थ, शरीर व मेंदूतील क्षमतेमध्ये काही बदल घडून येतात. वयाच्या तिशीनंतर घर व करियर अशा दुहेरी कसोटीतून आपल्याला पार जावं लागतं व त्यासाठी शरीर खमकं असणं गरजेचं असतं. त्यामुळे जसं बालपणापासून आपण डाएट घेत येतो तोच डाएट फॉलो करत राहणं चुक असतं. म्हणूनच वयाच्या तिशीनंतर खाली दिलेल्या काही पदार्थांपासून अंतर राखून राहिलं पाहिजे. चला तर जाणून घेऊया त्या पदार्थांविषयी जे वयाच्या तिशीनंतर आरोग्यास घातक ठरतात.

आहारातून हे पदार्थ करा बाद

बालपणी आपण खानपानाला विशेष महत्त्व न देता काहीही जे पुढ्यात दिसेल ते खात राहतो. पण वयाच्या तिशीनंतर मात्र आपल्याला खानपानावर खास लक्ष दिलं पाहिजे. या वयात जर आपण डाएटवर लक्ष दिलं नाही तर मात्र पुढे जाऊन म्हातारपणात याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. तिशीनंतर मीठ, मैदा आणि साखर हे पदार्थ कमी केले पाहिजेत. कारण या तीन गोष्टी डाएटमधून तुम्ही हटवल्या तर कायम फिट राहाल. आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ व निरोगी राहायचे असेल तर अधिकाधिक फळे, भाज्या व ड्राय फ्रुटचा आहारात समावेश करावा.

वजनावर नियंत्रण ठेवणं आहे गरजेचं

ब-याच लोकांचं वजन तिशीपर्यंत अमर्याद वाढत जातं तर काही लोकांचा लठ्ठपणा तिशीनंतर वाढण्यास सुरु होतो. त्यामुळे या वयानंतर तुम्हाला स्वत:च्या वजनावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नुसतंच वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं नसून त्यासोबत फिट राहणंही तितकंच आवश्यक असतं. कारण या वयात वाढलेलं वजन अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतं. वजन वाढणं किंवा नियंत्रणात राहणं काही प्रमाणात डाएटवर अवलंबून असतं. त्यामुळे खाणं आणि कॅलरी बर्न करणं या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणं गरजेचं आहे. जर याचा समतोल राखला नाही तर वजनात बदल होतो. तुम्ही जास्त खाल्लं आणि कमी प्रमाणात कॅलरी बर्न केल्या तर वजन वाढण्याची शक्यता असते.

सकाळी लवकर उठण्याची सवय लावा

तसं तर नेहमीच सकाळी लवकर उठणं गरजेचं असतं कारण याचे आरोग्यास अनेक लाभ होतात. पण जर तुम्हाला तरुणपणात ही सवय नसेल तर तिशीनंतर मात्र ही सवय लावून घ्याच. कारण याचे फायदे तुम्हाला उतारवयात दिसून येतील. सकाळी लवकर उठल्यामुळे शुद्ध माहोल, फ्रेश वातावरण, कोवळं ऊन आणि फ्रेश हवा मिळते. यामुळे संपूर्ण दिवस तणावमुक्त झाल्यासारखं वाटतं. कारण सकाळी सकाळी सुर्याच्या कोवळ्या किरणांपासून एक वेगळीच उर्जा शरीराला मिळते. शिवाय सकाळी लवकर उठल्यामुळे आपली कामेही लवकर होतात. त्यामुळे तिशी आधीच ही सवय स्वत:ला लावून घ्या जेणे करुन भविष्य आरोग्यदायी होईल.

स्ट्रेसवर मिळवा कंट्रोल

जर तुम्ही वयाच्या तिशीतच स्ट्रेस मॅनेज करायला शिकलात तर पुढे जाऊन येणा-या समस्यांवर तुम्ही फार लवकर मात करु शकाल. शिवाय स्ट्रेसवर कंट्रोल मिळवल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम शरीर व आरोग्यावर दिसून येतील. तिशीनंतर सर्वच लोकांवर घर, मुलं-बाळं, करियर सर्वच गोष्टींची जबाबदारी असते. त्यामुळे स्ट्रेस येणं ही सामान्य गोष्ट आहे, स्ट्रेस आयुष्यातील सामान्य गोष्ट असली तरी त्यावर विजय मिळवणं उत्तम! कारण स्ट्रेस न घेता खूप मोठं व आनंदी आयुष्य जगता येऊ शकतं.

कॅफीन व तळलेल्या पदार्थांपासून राहा दूर

तिशीनंतर प्रत्येक व्यक्तीने कॅफीनयुक्त पदार्थांचे सेवन बंद केले पाहिजे. कॅफीनमुळे त्वचेला नुकसान पोहचतं. कॅफीनयुक्त द्रव्य आपल्या झोपेवर नकारात्मक परिणाम करतात. यामुळे अनेकांची झोप कमी होते आणि अपु-या झोपेचे दुष्परिणाम आरोग्यावर झालेले दिसून येतात. तसंच कॅफीनयुक्त पदार्थांसोबतच तळलेले पदार्थांचाही यात समावेश आहे. जस जसं वय वाढतं तस तसं शरीराची पचनक्रिया म्हणजेच डायजेशन सिस्टम कमजोर होऊ लागते. या वयानंतर लोकांमध्ये अॅक्टिवनेस देखील कमी होतो. त्यामुळे तळलेले पदार्थ किंवा जंक फुड या वयात पचवणं अवघड जातं. याच्या सेवनामुळे त्वचा, केस व शरीरातील अनेक अवयवांवर नकारात्मक

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post