माय अहमदनगर वेब टीम
निरोगी आणि सुदृढ आरोग्य हवं असेल तर आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा असा सल्ला कायमच डॉक्टरांकडून दिला जातो. त्यासोबत सकाळचा नाश्ता भरपेट करावा, दुपारचं जेवण थोडं कमी करावं आणि रात्रीचं जेवण अत्यंत हलकं घ्यावं असंही म्हटलं जातं. मात्र, अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा काही जण रात्रीच्या जेवणात मसालेदार पदार्थ, फास्टफूड यांचा समावेश करतात.मात्र, ते शरीरासाठी अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या पदार्थांचं सेवण करणं टाळलं पाहिजे हे जाणून घेऊयात.
१. भात –
अनेकांना रात्री भात खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. मात्र, रात्रीच्या वेळी भात खाल्ल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी निर्माण होण्याची शक्यता असते. रात्री भात खाल्ल्याने पोटाकडील चरबी वाढते.
२. फास्ट फूड / तेलकट पदार्थ –
पिझ्झा, बर्गर, फ्राईज यासारखे फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ रात्रीच्या वेळी खाणे टाळा. अपचन किंवा अॅसिडिटीमुळे निद्रानाश होऊ शकतो.
३. चॉकलेट –
काही जणांना रात्री जेवण झाल्यावर गोड खाण्याची सवय असते.त्यामुळे बऱ्याच वेळा चॉकलेट खाल्लं जातं. मात्र, चॉकलेट हे कितीही आवडीचे असले तरी झोपण्यापूर्वी ते खाऊ नका. कारण चॉकलेट्समधेही काही प्रमाणात कॅफेन असते. तेव्हा रात्रीच्या वेळी चॉकलेटच्या अतिसेवनामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
४. मांसाहारी पदार्थ –
रात्रीच्या वेळी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. कारण, मांस पचायला २४ ते ७२ तासांचा कालावधी लागतो. यामुळे वजन तर वाढतेच पण रात्री अपचनामुळे झोपमोडही होऊ शकते. तेव्हा मांसाहार करणे टाळा.
५. चायनीज पदार्थ –
चायनीज पदार्थांमध्ये एमएसजी अर्थात मोनोसोडियम ग्लुटामेट असते. आरोग्याच्या दृष्टीने तो घातक असतोच पण त्यामुळे निद्रानाशही होऊ शकतो.
दरम्यान, रात्री जेवण केल्यानंतर एक दोन तासातच आपण झोपी जातो, त्यामुळे पचनक्रिया मंदावते अशावेळी फारच कमी खाणे किंवा हलके फुलके खाणे फायद्याचे ठरेल. अनेक पदार्थ हे पचायला जड असतात त्यामुळे रात्री शक्यतो कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. तेव्हा रात्री जेवताना काही पदार्थ खाणे हे आवर्जुन टाळले पाहिजे.
(टीप : ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
Post a Comment