हिवाळ्यातील 'या' जीवघेण्या आजारापासून राहायचं असेल लांब, तर सोडू नका या खास पदार्थांची साथ!

 


माय अहमदनगर वेब टीम

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच करोना व्हायरसने  जगात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. मार्चमध्ये सरकारने संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर केला व नागरिकांच्या संरक्षणाकरता आवश्यक ती पावले उचलली. करोना व्हायरस आजही देशात पसरत चाललाच आहे पण त्याच दरम्यान दरवर्षी लाखो लोकांना आपल्या विळख्यात घेरणा-या व हजारो लोकांचा जीव घेणा-या आजाराला यावर्षी मात्र हलक्यात घेतलं जात आहे. हो मंडळी, आम्ही डेंग्यूविषयी बोलतोय. डेंग्यू करोना व्हायरससारखा संक्रमित आजार जरी नसला तरी तो कमी खतरनाक आजार नक्कीच नाही. एक खास मच्छर  चावल्याने डेंग्यू होतो. प्रत्येक वर्षी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढच झालेली दिसून येते. पावसाळ्यानंतर म्हणजेच हिवाळ्यात  हा आजार अत्यंत वेगाने पसरतो. 

डेंग्यू घाण पाण्यात जन्मास येणा-या अळ्या किंवा मच्छरांमुळे होतो. यापासून बचाव करायचा असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे घरात साफसफाई ठेवा, साचलेल्या डबक्यात पाय घालू नका, घरातील पाणी रोजच्या रोज बदला. कारण उपचारांपेक्षा डेंग्यूला आळा घालणं जास्त सोपं आहे. या आजाराची सुरुवात डोकेदुखी, उलटी, अंगदुखी व तीर्व तापाने होते. हे एकदम वरच्या स्टेजला गेल्यास हिरड्यांमधून रक्त येणं, पोटदुखी, रक्ताची उलटी अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणं दिसून आली तर सर्वप्रथम डॉक्टरांची भेट घ्या. उपचार व औषधांव्यतिरिक्त यामध्ये डाएट फॉलो करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच आज आम्ही आपल्याला त्या पदार्थांविषयी सांगणार आहोत जे या आजारातून तुम्हाला मुक्त करतील किंबहुना आजाराला आळा घालतील.

संत्री

संत्री हे एक असं फळ आहे जे व्हिटॅमिन व मिनरल्सने परिपूर्ण असतं. यामध्ये असे पोषक तत्व आढळतात जे रुग्णाला लवकर बरं करतात. संत्र्यात फायबर तर असतातच पण व्हिटॅमिन सी हे देखील मोठ्या प्रमाणात आढळते. डेंग्यूला आळा घालण्यास व या आजारातून लवकर बरं होण्यास वरील दोन्ही पोषक तत्वे एखाद्या अॅंटीऑक्सिडंटप्रमाणे कार्य करतात. तुम्ही किंवा नातेवाईक डिंग्यूच्या आजारातून जात असाल तर संत्रीचे सेवन नक्की करा. डॉक्टर देखील हे फळ खाण्याचा सल्ला देतातच.

नारळ पाणी

डेंग्यू झाल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता होऊ लागते. त्यामुळे डेंग्यू झाल्यास शरीर हायड्रेटेड ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. कारण तुम्ही या काळात जितकं जास्त पाणी प्याल तितकं जास्तीत जास्त लवकर तुम्ही बरे व्हाल. शरीर हायड्रेटेड ठेवण्यास पाणीच पुरेसं आहे पण नारळ पाण्यात अधिक पोषक तत्व व इलेक्ट्रोलाइट्स असतात. जे की शरीरात लिक्विड पदार्थांची पूर्ती करतानाच शरीरातील टॉक्सिक म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत करतात.

डाळींब व पपईची पाने/बीज

छोटे छोटे दाने असलेलं हे फळ आयरन म्हणजेच लोहाचा सर्वोच्च स्त्रोत आहे. जे की रक्ताच्या पेशींचे प्रमाण वाढवण्यास मदत करतं. जर या पेशींचे संतुलन राखले तर तब्येतीत लवकर सुधारणा होते. या आजारात अशक्तपणा जाणवतो. हे फळ अशक्तपणा दूर करतं. तर डेंग्यूच्या रुग्णांना पपईच्या पानांचा रस किंवा बिया खाण्याचा सल्ला दिला जातो. बिया व पानांतील रस रुग्णाला भरपूर लाभ पोहचवतात. तसंच हे रक्ताच्या पेशी देखील वाढवतात. रिसर्चद्वारे समजलं की एडीज मच्छरांसाठी पपईच्या बिया टॉक्सिक असतात. एडीजच्या मच्छरांपासूनच डेंग्यूची सुरुवात होते.

पालक व हळद

असं तर हळदीचे लाभ कोणापासून लपलेले नाहीत. हळद अॅंटिसॅप्टिक व मेटाबॉलिज्म बूस्टर असल्यामुळे दुधात हळद घालून पिण्याचा सल्ला दिला जातो. आजारा दरम्यान हळदीचं दूध आराम मिळवून देतं. तर पालक पोषक तत्वांनी संपन्न भाजी मानली जाते. पालकमध्ये व्हिटॅमिन, ओमेगा ३ अॅसिड, आयरन भरपूर प्रमाणात आढळतं. पालकमधील हे पोषक तत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. कारण रोगप्रतिकारक शक्ती रोगाशी लढण्यास व लवकर मुक्ती मिळवण्यास खूप गरजेची असते.

मेथी

चांगल्या झोपेसाठी मेथी खूपच लाभदायक असते. ही झोप वाढवण्यासोबतच हलक्या ट्रैंक्विलाइजरचं काम करते जे की वेदना कमी करण्यास उपयोगी ठरतं. यासोबतच मेथी अंगात तीव्र ताप असल्यास तो घालवण्यास मदत करते. डेंग्यूच्या आजारात ताप हे मुख्य लक्षण मानले जाते.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post