माय अहमदनगर वेब टीम
लिस्बन : ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या एकमेव गोलमुळे पोर्तुगालने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत अँडोरा संघावर ७-० असा दणदणीत विजय मिळवला.
या गोलमुळे देशातर्फे सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाच्या दिशेने रोनाल्डोने कूच केली आहे. रोनाल्डोचे १०२ गोल झाले असून सर्वाधिक १०९ गोलचा विक्रम इराणच्या अली दाएई यांच्या नावावर आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तसेच करोनाच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर रोनाल्डोने पुनरागमन केले असून मध्यंतरानंतर मैदानावर उतरलेल्या रोनाल्डोने ८५व्या मिनिटाला गोल करत पोर्तुगालला ६-० अशी आघाडी मिळवून दिली होती.
Post a Comment