माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर माहाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. शिवसेनेना नेते अनिल परब यांनी भाजपवर टीका करताना भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात कोंडलं, असं म्हणाले होते. यावर, भाजपनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्य सरकारवर टीका करत भाजप नेत्यांनी अर्णब यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलनं आणि मोर्चा काढा असं आवाहनच भाजप कार्यकर्त्यांना दिलं होतं. त्यानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. या टीकेला उत्तर देतानाच चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेला घेरलं आहे.
'अर्णब गोस्वामी हा आमचा पोपट नाही. आम्ही पोपट पाळत नाही पोपट तेच पाळतात,' असं म्हणत शिवसेनेचा उल्लेख न करता टीका केली आहे. सोनिया गांधींच्या विरोधात मत व्यक्त केले म्हणून गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. गांधी घराणे, काँग्रेस आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात बोलणाऱ्या पत्रकारच नव्हे तर सामान्य माणसांचाही आवाज बंद करण्याचा प्रयत्न महाआघाडी सरकारच्या राजवटीत होत आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
काय म्हणाले होते अनिल परब?
अर्णब गोस्वामींनी नाईक यांचे पैसे बुडवले. त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक समस्येतून त्यांनी आत्महत्या केली. एका मराठी भगिनीचं कुंकू गोस्वामींमुळे पुसलं गेलं. या प्रकरणाचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी कोणताही संबंध नाही. मग भाजप नेते गोस्वामींच्या अटकेवरून इतका आरडाओरडा कशासाठी करताहेत? गोस्वामी काय भाजपचा कार्यकर्ता आहे का?, असा सवाल अनिल परब यांनी केला आहे.
Post a Comment