माय अहमदनगर वेब टीम
अर्णव गोस्वामीला न्यायालयीन कोठडीत असताना मोबाइल उपलब्ध करून दिल्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासात अलिबाग कारागृहातील अनंत भेरे (सुभेदार) आणि सचिन वाडे (शिपाई) या दोन कारागृह पोलिस कर्मचाऱ्यांची नावे पुढे आली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
अर्णवला अलिबाग येथील मराठी शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. तेथे तात्पुरती तुरुंगसुविधा तयार करण्यात आली होती. तेथे अर्णव याने मोबाइल वापरला असल्याची तक्रार रायगड पोलिसांनी केली होती. त्यानंतर अर्णवला तळोजा येथील कारागृहात सुरक्षेच्या कारणास्तव हलवले. त्याबाबत इतर आरोपींकडे चौकशी सुरू होती. या तपासामध्ये दोन कारागृह पोलिस कर्मचाऱ्यांनी इतर काही आरोपींना मोबाइल उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे येथील कारागृह व्यवस्थापनाबाबत आता संशय व्यक्त होत आहे.
Post a Comment