माय अहमदनगर वेब टीम
नाश्ता असो किंवा लंच आणि डिनर, आपण तेच पदार्थ खाणं पसंद करतो जे आपल्याला मनापासून आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का? दिवसाची सुरुवात ही नेहमी हेल्दी पदार्था पासूनच करावी. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आपण जो पदार्थ पहिला खातो त्याचा परिणाम दिवसभर आपल्या शरीरावर राहतो. त्यामुळे सकाळी सकाळी असा कोणताच पदार्थ खाऊ नये ज्यामुळे आपल्या पोटाला कोणतं नुकसान होईल.
एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, सकाळी आपण उठल्यानंतर आपली पचनक्रिया लगेचच कार्य करण्यास सुरुवात करत नाही तर हे कार्य करण्याची सुरुवात करण्यासाठी पचन तंत्राला बराच उशीर लागतो. त्यामुळे पचन तंत्राला काही वेळ देणं गरजेचं असतं. उठल्यानंतर कमीत कमी २ तासांनंतरच काहीतरी हेल्दी खावं किंवा भरपेट नाश्ता करावा. चला तर जाणून घेऊया सकाळी सकाळी कोणते पदार्थ खाणं कटाक्षाने टाळलं पाहिजे.
कॉफी
साधारणत: लोक आपल्या दिवसाची सुरुवात कडक कॉफी पिऊनच करतात. पण रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने भयंकर अॅसिडीटी होऊ शकते. हे पचन तंत्रात हायड्रोक्लोरिक अॅसिडच्या स्त्रावास वाढवतं ज्यामुळे बहुतांश लोकांना गैस्ट्राइटिस सारख्या समस्येचा सामना करावा लागतो. रिकाम्या पोटी कॉफी घेतल्यामुळे त्याचा परिणाम नकळत तुमच्या आतड्यांवर होतो. ज्यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते आणि भूक कमी लागते.सकाळी उठल्या उठल्या कॉफी प्यायल्यामुळे शरीरातील विषद्रव्ये अथवा टॉक्सिन्स बाहेर टाकली न जाता त्यांचे प्रमाण शरीरात अधिकच वाढतं. कॉफीमधील साखरेमुळे तुमच्या रक्तातील साखर वाढते आणि हळूहळू तुमचे वजन अनियंत्रित होतं.
आंबट फळं
फळं जर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ली गेली तर ती आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. रिकाम्या पोटी आंबट फळांचे सेवन केल्यास शरीरात अॅसिड अधिक प्रमाणात बनू शकतं. फळांमध्ये भरपूर प्रमाणात फ्रक्टोज आणि फायबर असतं जे पचनक् तंत्रांचं कार्य बिघडवू शकतं. तुम्ही खास करुन पेरू आणि संत्री या सारखी आंबट फळे सकाळी सकाळी खाणं टाळलं पाहिजे.
थंड शीतपेय
दिवसाची सुरुवात गरम पाणी आणि मध याच्या सेवनाने करणं अत्यंत लाभदायक असतं. पण काही लोक रिकाम्या पोटी कोल्ड कॉफी पिण्याचे शौकिन असतात. रिकाम्या पोटी थंड शीतपेय प्यायल्याने आपल्या म्युकस मेम्ब्रेनला नुकसान होतं आणि संपूर्ण दिवसभर आपली पचनक्रिया स्लो होऊ शकते. त्यामुळे सकाळी कधीही गरम पाणी, लिंबू आणि त्यात मध मिक्स करुन ते प्यायलं पाहिजे. यामुळे पोट साफ होतं, रिफ्रेश वाटतं, शरीराला एक नवी उर्जा प्रदान होते.
कच्च्या भाज्या
सलॅड आणि कच्च्या भाज्या रिकाम्या पोटी खाणं हानीकारक असतं. यामध्ये मोठे फायबर असतात जे रिकाम्या पोटी खाल्लास सहजपणे पचत नाहीत. याचं सेवन केल्याने पोट जड जड वाटू लागतं. सोबतच पोट फुगण्याची आणि पोट दुखण्याची समस्या होऊ शकते.सलॅडमुळे आपल्या पोटात फायबरचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पोटावर जोर येऊन टॉरशन, गॅस, छातीत जळजळ यांसारख्या समस्या सुरू होतात. एवढेच नाही तर उपाशी पोटी सलॅड किंवा कच्च्या भाज्या खाल्ल्याने अस्वस्थता आणि उलट्या देखील होऊ शकतात.
मसालेदार पदार्थ
सकाळी सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार अन्नपदार्थांचे सेवन केल्यास पोटात जळजळ होऊ शकते. यासोबतच अॅसिडीटी आणि पोटात संकुचन निर्माण होण्याची समस्या होऊ शकते. मसालेदार पदार्थ सहाजिकच झणझणीत असतात जे अपचनाची समस्या वाढवतात. त्यामुळे कधीच मसालेदार पदार्थ रिकाम्या पोटी खाऊ नयेत.
गोड पदार्थ व ज्यूस
बहुतांश लोक सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास गोड फळांचा ज्यूस पितात. पण एक्सपर्ट्सच्या मते, रिकाम्या पोटी गोड ज्यूसचं सेवन केल्याने स्वादुपिंडावर अतिरिक्त दबाव पडतो आणि पचनक्रिया बिघडू शकते. फळांच्या रसात फ्रक्टोज अधिक प्रमाणात असते जे की साखरेचंच एक रुप आहे. रिकाम्या पोटी याचं सेवन केल्याने लिवरच्या समस्या उद्भवू शकतात. सकाळी आपण उपाशी पोटी जे काही खातो त्यामुळे आपल्याला संपूर्ण दिवसभर काम करण्याची एनर्जी प्राप्त होते. त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवा की सकाळचं पहिलं सेवन हे हेल्दी फुडचंच झालं पाहिजे जेणे करुन पोटाला कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत.
Post a Comment