प्रताप सरनाईक हे कोणी साधूसंत नाहीत; 'या' नेत्याचा जोरदार टोला

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई: 'शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे कोणी साधूसंत नाहीत. मीडियानं आधी त्यांची माहिती घ्यावी, मग आम्ही संपूर्ण प्रकरणावर बोलू,' अशी सूचक प्रतिक्रिया भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिली आहे.

प्रताप सरनाईक यांच्या घरावर व मुंबई, ठाण्यातील कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयानं (ED) आज छापे टाकले. सरनाईक यांच्यावरील कारवाईमुळं शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. तर, राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना ईडीलाच आव्हान दिलं आहे. 'भाजपच्या १०० नेत्यांची यादी आम्ही ईडीला देतो. त्यांचे काय उद्योग आहेत? त्यांचा पैसा कोठून येतो? काय नामी आणि काय बेनामी याची सगळी माहिती आम्ही ईडीला देऊ. होणार का कारवाई?,' असं राऊत म्हणाले. तर, हा 'ऑपरेशन लोटस'चा एक भाग असू शकतो, अशी शंका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post