माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - आणखी एक रात्र थंडीत काढल्यानंतर हजारो शेतकऱ्यांनी सलग चौथ्या दिवशी रविवारी केंद्राच्या नव्या शेतकी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का ? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.“जो शेतकरी तुमचा अन्नदाता आहे त्याला तुम्ही दहशतवादी, देशद्रोही म्हणत आहात. पंजाब, हरियाणामधील शेतकरी महाराष्ट्राप्रमाणे आहे. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्यं आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का?,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असे गेले ४ दिवस दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी सांगितले.“पंजाबच्या शेतकऱ्यांनी जगासमोर आदर्श ठेवत शांततेत आंदोलन या देशाच्या इतिहासात कधी झालं नव्हतं. ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला जातो हा बळाचा वापर जर चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलं नसतं,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
Post a Comment