जनतेच्या पैशाचा गैरवापर शिवसेना सहन करणार नाही -अभिषेक कळमकर



.
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जनतेच्या पैशाचा गैरवापर शिवसेना कदापी सहन करणार नाही जोपर्यंत तपोवन रस्ता उत्तम प्रकारे होत नाही तोपर्यंत शिवसेना या कामाकडे लक्ष देणार असल्याचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे. 
गेल्या अनेक वर्षापासून उपनगरातील तपोवन रस्ता हा अत्यंत खराब होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम झाले होते. हे काम पूर्ण होताच थोड्याच दिवसात काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे रस्त्याची चाळण झाली होती. त्यावेळी स्व. अनिल राठोड यांनी याची पाहणी करुन संबंधित खात्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी यांनी या रस्त्याची पाहणी करुन काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल राज्य शासनाला दिला होता. हा रस्ता पुन्हा चांगला करुन देण्याची मागणी शिवसेनेने केली होती. या मागणीची दखल घेत 1 नोव्हेंबर पासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले याची पाहणी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, संभाजी कदम, संजय शेंडगे, गिरीश जाधव, बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, सचिन शिंदे, अक्षय कोतोरे, डॉ. चंद्रकांत बारस्कर, ऋषीकेश ढवण, अभिषेक भोसले, प्रशांत पाटील यांनी पाहणी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post