माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या चौकशीत समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नारकोटिक्स कण्ट्रोल ब्यूरोने (एनसीबी) टॅलेन्ट एजन्सी क्वानची कर्मचारी करिश्मा प्रकाश हिला सातत्याने चौकशीचे समन्स बजावले. दरम्यान, करिश्माने काही दिवसांपूर्वीच एजन्सी सोडल्याची माहिती आता समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करिश्मा यापुढे या एजन्सीची कर्मचारी नाही. करिश्मा गेल्या काही महिन्यांपासून क्वान या टेलॅन्ट एजन्सीसाठी ज्युनिअर मॅनेजर म्हणून काम करत होती. दीपिका पादुकोण व्यतिरिक्त इतर सेलिब्रिटींचंही ती काम पाहत होती.
एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली. यात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग यांचीही चौकशी करण्यात आली. त्याआधी एनसीबीने दीपिकाची मॅनेजर करिश्माची विशेष चौकशी केली होती. काही दिवसांनी एनसीबीने दुसऱ्यांदा करिश्माला चौकशीसाठी समन्स पाठवला असता तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच ती चौकशीसाठीही हजर राहिली नाही. करिश्माने दीपिकासाठी काम करणं बंद केल्याचीही माहिती आता समोर आली आहे.
Post a Comment