माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील बनावट डिझेल व नाफ्ता भेसळ रॅकेटचा योग्य दिशेने तपास करून मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आज पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. मात्र त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राजकीय मंत्र्याच्या दबाव असल्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हाती लागत नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता पोलीस कारवाईत हस्तक्षेप करणारा 'तो' मंत्री कोण ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाले आहे.
नगर शहरांमध्ये बनावट डिझेलचा टँकर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पकडण्यात आला होता. या कारवाईला आता पंधरा दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. यासंदर्भात आज कर्डिले यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी त्यांनी केली. तसे निवेदनही त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले असून राजकीय वरदहस्त असल्याने खुलेआम बनावट डिझेल विक्री केली जात असल्याचा आरोप केला आहे. केवळ राजकीय दबावापोटी कारवाईस विलंब होत असल्याचेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. राजकीय दबावाला बळी न पडता बनावट डिझेल व नाफ्ता भेसळीचा योग्य व निपक्ष तपास करून मुख्य सूत्रधार व इतर सहआरोपींना त्वरीत अटक करावी, अशी मागणी केली आहे.एक्झिट पोल विरोधात असले तरी उत्तर उद्या मिळेलबिहार निवडणुकीच्या संदर्भात दाखवण्यात आलेल्या एक्झिट पोल विषयावरही माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, 'देशातील लोकसभा निवडणूक होती, तेव्हा सुद्धा एक्झिट पोल असे दाखवत होते की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता येणार नाही. प्रत्यक्षात बहुमताने देशात मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली. त्यामुळे बिहारबाबतीत एक्झिट पोल विरोधात असले तरी प्रत्यक्षात उद्याच उत्तर मिळेल.' तर, फटाके बंदीबाबत बोलताना ते म्हणाले, 'फटाके व्यवसायिकांनी लाखो रुपये खर्च करून माल भरला आहे. त्यामुळे आता फटाके बंदचा निर्णय घेतला तर छोटे-मोठे व्यावसायिक, उद्योजक यांच्यावर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही. मुळात दिवाळी हा सण फटाके वाजल्यावरच आल्याचे कळते.'
Post a Comment