माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – पेमराज सारडा महाविद्यालयास यशाची मोठी एतेहासिक परंपरा आहे. सर्व प्राध्यापक तळमळीने विद्यादान करत आहेत. आता पेमराज सारडा महाविद्यालयास डॉ.राजेंद्र शिंदे यांच्या रूपाने चांगले अनुभवी प्राचार्य मिळाले आहेत, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी यांनी केले.
हिंद सेवा मंडळाच्या कार्यकारणीच्या बैठकीत पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. डॉ.राजेंद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक व सचिव संजय जोशी यांनी नूतन प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी कार्याध्यक्ष अजित बोरा, पेमराज सारडा महाविद्यालयाचे चेअरमन अॅड. अनंत फडणीस, माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, डॉ.पारस कोठारी, अशोक उपाध्ये, मधुसूदन सारडा, अनिल देशमुख, मकरंद खेर, जगदीश झालानी, आदिक जोशी, सचिन मुळे, अनंत देसाई, सहाय्यक सचिव बी.यू.कुलकर्णी आदी पादाधीकारींसह महाविद्यालयाचे प्रबंधक अशोक असेरी, उपप्राचार्य डॉ.मंगला भोसले, डॉ.सुजय कुमावत आदी उपस्थित होते.
प्रा.शिरीष मोडक म्हाणाले, पेमराज सारडा महाविद्यालाच्या प्राध्यापक वर्गाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कायमच सहकार्य व पाठबळ असते. नवे प्राचार्य राजेंद्र शिंदे यांनी आता सक्षम भूमिका बजावत महाविद्यालयास वेगळ्या उंचीवर न्यावे.
अजित बोरा म्हणाले, सारडा महाविद्यालय नॅक मानांकनाची तयारी करत आहे. यासाठी नूतन प्राचार्यांनी सर्व बाबींची लवकरात लवकर पूर्तता करावी.
मकरंद खेर म्हणाले, प्राचार्य म्हणून काम करतांना सर्व प्राध्यापक वर्गाला बरोबर घेत विश्वासाने काम करा.
अशोक उपाध्ये म्हाणाले, सारडा महाविद्यालयास प्रगती पथावर नेण्यासाठी नवे प्राचार्यांना शुभेच्छा.
अॅड.अनंत फडणीस म्हणाले, डॉ.राजेंद्र शिंदे यांनी उपप्राचार्या म्हणूनही चांगले काम केले आहे. आता उत्तम प्राचार्य म्हणूनही ते चांगले काम करतील.
ब्रिजलाला सारडा म्हणाले, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध चांगल्या योजना राबवून उत्कृष्ठ कारभार करावा.
सत्कारास उत्तर देतांना डॉ.राजेंद्र शिंदे म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारींनी प्राचार्य पदाची मोठी जवाबदारी दिली आहे. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत अधिक वेगाने महाविद्यालयास प्रगती पथावर नेणार आहे.
प्रताविकात डॉ. पारस कोठारी यांनी चांगल्या कामास सुरवात करतांना मंडळाचे संपूर्ण सहकार्य राहील असे सांगितले. बी.यू.कुलकर्णी यांनी आभार मानले.
Post a Comment