माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी काउंटिंग सुरू आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, आतापर्यंतच्या आकडेवारीत बायडेन यांना 227, तर ट्रम्प यांना 213 इलेक्टर्स मतं मिळाले आहेत.जिंकण्यासाठी 270 इलेक्टोरल वोट्स हवेत आहेत, मात्र यावेळी प्रकरण अडकणार असल्याचे दिसत आहे. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण - अजुनही मोठ्या प्रमाणात बॅलटची मोजणी होणे बाकी आहे. दुसरे कारण म्हणजे - ट्रम्प यांनी विजयाची एकतरफी घोषणा केली आहे. ते म्हणतात की, आम्ही जिंकलो आहोत, तर आता सर्व वोटिंग थांबायला हवी. यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ.
सर्वात महत्त्वाचे स्विंग स्टेट फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांचा विजय
यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प 29 इलेक्टर्सच्या सर्वात महत्त्वाचे स्विंग स्टेट फ्लोरिडामध्ये विजय कायम ठेवण्यात यशस्वी झाले. असे म्हटले जाते की, या स्विंग स्टेटमध्ये जो जिंगतो, तोच व्हाइट हाउसमध्ये पोहोचतो. 100 वर्षांचा हा इतिहास आहे. NBC च्या एग्जिट पोलनुसार फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या लॅटिन अमेरिकी वोटर्स ट्रम्प यांच्यासोबत होता. क्यूबा वंशाचे 55%, प्यूर्टोरिकोचे 30% आणि 48% इतर लॅटिन अमेरिका मुळचे वोटर ट्रम्प यांच्या सोबत होते. यामुळेच त्यांना आतापर्यंत एकूण 51.6% मतं मिळाले.
Post a Comment