माय अहमदनगर वेब टीम
रविवार, १५ नोव्हेंबर २०२०. चंद्र दुपारनंतर तुळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. वृश्चिक राशीत केतु विराजमान असल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. आजच्या दिवसाचे एकूण ग्रहमान पाहता मेष आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतील. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया.
मेष : आपले महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. व्यापारी वर्गाने आपली नवीन उत्पादने बाजारात आणण्यास अनुकूल कालावधी. भावंडांचे सल्ला मोलाचा ठरेल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. कार्यक्षेत्रात एखादा करार मार्गी लागू शकतो. सामाजिक कार्यामुळे मान, सन्मान प्राप्त होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणूक लाभदायक ठरू शकेल.
वृषभ : समोरच्या व्यक्तीला पारखून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. नवीन विचार आणि नवीन योजनांवर कामे सुरू करू शकाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. पराक्रम वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी, उत्साही आणि सकारात्मक असेल. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
मिथुन : सणासुदीत आपल्या आरोग्याला कमी लेखू नका. आजचा दिवस रचनात्मक कामे करण्यात व्यतीत होईल. प्रलंबित कामांत प्रगती झालेली दिसून येईल. एखादी भेटवस्तू मिळण्याचे संकेत. नवीन योजना स्फुरतील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. नातेसंबंध आणखीन दृढ होतील.
कर्क : घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण ठेवा. प्रामाणिक आणि एकाग्रतेने केलेल्या कामाचे लगेच परिणाम दिसून येईल. घर आणि कार्यालयातील प्रलंबित कामे प्राधान्याने मार्गी लावावीत. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होतील. नको त्या प्रलोभनात अडकू नका. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.
सिंह : हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळून जातील. दिनक्रम अतिशय व्यस्त राहील. नियोजन, व्यवस्थापन यातून व्यवसायात प्रगती होऊ शकेल. विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. नवीन कामाची रुपरेषा आखाल. सासरच्या मंडळींकडून मान, सन्मान मिळतील. पाहुण्यांचे आगमन मन प्रसन्न करेल. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. भाग्याची साथ लाभेल.
कन्या : प्रतिस्पर्ध्यावर आपले वर्चस्व कायम राखाल. कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. त्यातून लाभ मिळतील. ख्याती वाढेल. विद्यार्थ्यांना गुरुजनांचे आशीर्वाद प्राप्त होतील. वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. शुभ कार्याच्या आयोजनाबाबत घरात चर्चा होतील. नशीबावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. व्यापारात गुंतवणुकीस उत्तम कालावधी.
तुळ : आजच्या दिवसात उत्तम लिखाण अथवा वाचन होईल. कार्यक्षेत्रातील वाद संपुष्टात येऊ शकतील. नवीन प्रकल्पावर काम सुरू करू शकाल. वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीमुळे प्रलंबित कामे मार्गी लागतील. कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत करू शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मिळकतीचे नवे स्रोत सापडतील. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल.
वृश्चिक : लोकांकडून आपल्या कलेचे कौतुक केले जाईल. आजचा दिवस सकारात्मक असेल. दिवसाच्या सुरुवातीपासून काही ना काही लाभ मिळू शकतील. व्यापारात प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. कुटुंबात सुख, शांतता आणि स्थिरतेच्या आनंदाची अनुभूती घ्याल. नोकरदार वर्गाला उत्तम परिणाम प्राप्त होतील. रागावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.
धनु : अनावश्यक ठिकाणी प्रतिक्रया देणे टाळा. लाभाचा योग प्रबळ होईल. व्यवसायात जोखीम पत्करल्यास मोठा फायदा होऊ शकेल. रोजच्या कामातून काहीतरी नवीन गवसेल. आप्तेष्टांसाठी पैशांची सोय करावी लागू शकेल. व्यवसायिक क्षेत्राचा विस्ता होईल. विद्यार्थ्यांना ज्येष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्तींची भेट लाभदायक सिद्ध होईल. हितशत्रू पराभूत होतील. भावंडांशी असलेले नाते दृढ होईल.
मकर : दिवसभरात छोटे प्रवासाचे योग येतील. भागीदारीतील व्यापार फायदेशीर ठरतील. घरातील प्रलंबित कामे प्राधान्याने पार पाडाल. मुलांच्या विवाहाच्या चिंता मिटतील. मान, सन्मान प्राप्त होतील. व्यापारानिमित्तचे प्रवास लाभदायक ठरतील. अनेक कामे एकत्रित आल्याने व्यस्तता वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील.
कुंभ : शांततेत वेळ घालवून मानसिक स्वास्थ्य जपा. मेहनत आणि समर्पणानेसमर्पणाने केलेली कामे यशस्वी होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यापारी वर्गाला सुखद दिवस. कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. सारासार विचार करूनच कामे मार्गी लावावीत. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत.
मीन : आपली सामाजिक प्रतिष्ठा, सन्मान वाढेल. नवीन प्रकल्पावर कार्य करण्याची मंजुरी मिळेल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. व्यापारी वर्गाने जोखीम पत्करून केलेल्या कामांतून चांगला फायदा मिळू शकेल. गरजू व्यक्तीला मदत केल्याने समाधान मिळेल. कौटुंबिक ताण-तणावाची परिस्थिती धैर्य, संयमाने हाताळणे हिताचे ठरेल.
Post a Comment