माय अहमदनगर वेब टीम
बुधवार, ०४ नोव्हेंबर २०२०. चंद्र आपलेच स्वामीत्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर बुध मार्गी चलनाने तुळ राशीत विराजमान झाला आहे. यामुळे शुक्र आणि बुधचा शुभ योग जुळून येत आहे. तसेच संकष्ट चतुर्थी, करवा चौथ अशी दोन महत्त्वाची व्रते आहेत. एकूण ग्रहमान पाहता तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया...
आजचे मराठी पंचांग : बुधवार, ०४ नोव्हेंबर २०२०
मेष : अनावश्यक खर्चांवर योग्य नियंत्रण गरजेचे. प्रलंबित कामे मार्गी लागतील. अचानक नव्या गोष्टींना सामोरे जावे लागेल. स्वप्नांच्या दुनियेत राहाल. खर्चात वाढ संभवते. बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करण्यात यश येईल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. दिवसाचा उत्तरार्ध मौज-मजा, हास्य-विनोदात व्यतीत होऊ शकेल.
वृषभ : मानसिक शांतता व समाधान लाभेल. प्रयत्नांना यश मिळेल. आपल्या कलेला बहर येईल. नवीन गोष्टीत जास्ती कष्ट करावे लागतील. आजचा दिवस शुभ फलदायी ठरू शकेल. शासनाकडून लाभ मिळू शकतील. पद, प्रतिष्ठा वाढीस लागण्याचे संकेत. अनावश्यक कष्ट करावे लागू शकतील. नवीन संधी उपलब्ध होतील.
मिथुन : मुलांच्या प्रगतीने मन प्रसन्न होईल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल. मनातल्या सगळ्या कामना पूर्ण होतील. घरामध्ये नवीन खरेदी कराल. दिवसभरात काही ना काही अडचणींना सामोरे जावे लागू शकेल. स्पर्धेत अपेक्षित यशप्राप्ती शक्य. एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल.
कर्क : मुलांच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडाल. मित्रांशी सुख-संवाद होईल. जवळच्या व्यक्तीकडून फसगत होऊ देऊ नका. दक्षता बाळगा. आजिविकेच्या क्षेत्रात प्रगती होईल. ग्रहांचे पाठबळ शुभ फलदायक ठरू शकतील. मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढीस लागेल. प्रवास घडतील. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम जाईल.
सिंह : बोलण्यातील माधुर्य मान वाढवेल. धावपळ होईल. नोकरीमध्ये कामाचा बोजा वाढेल. मुलांकडून अपेक्षा पूर्ण होतील. मिळकतीचे नवे स्रोत उपलब्ध होतील. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. विरोधक पराभूत होतील. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस.
कन्या : मुलांकडून शुभवार्ता मिळतील. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. पैशाची गुंतवणूक करताना धोका पत्करू नका. व्यवसायात पाया भक्कम बनेल. रोजगार क्षेत्रातील प्रयत्नांना अकल्पनीय यश मिळेल. शुभ फलदायी दिवस ठरू शकेल. सरकारी कामे पुढे सरकतील. कीर्ती वृद्धिंगत होईल.
तुळ : दिवसभरातील कामे सुलभतेने पार पडतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दूरचे प्रवास घडतील. आपल्या मताशी ठाम रहा. सर्वार्थाने अनुकूल दिवस. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. समस्यांचे निराकरण होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी, उत्साही व सकारात्मक राहील.
वृश्चिक : काहीसा आव्हानात्मक दिवस. मित्रांचे सहकार्य मोलाचे ठरेल. जोडीदाराचे मानसिक आरोग्य सांभाळा. जुनी उधारी वसूल होईल. कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकेल. आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल.
धनु : कार्यक्षेत्रात कौतुक होईल. शासनाकडून लाभ मिळू शकेल. आरोग्याच्या तक्रारी बाबतीत तडजोड करू नका. दुसरा सल्ला उपयोगी पडेल. विरोधक पराभूत होतील. प्रलंबित कामे गतीने मार्गी लागतील. सामाजिक कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. मन प्रसन्न राहील. धनलाभ संभवतो.
बुध मार्गी : 'या' ९ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभदायक कालावधी; वाचा
मकर : आजिविका क्षेत्रातील प्रयत्न यशस्वी होतील. कोणत्याही वादात पडू नये. लोकांच्या बोलण्याने आपले विचार ढळू देऊ नका. दिवस मजेत घालवाल. आर्थिक आघाडीवर प्रगती होऊ शकेल. कार्यालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पाहुण्यांचे आगमन मन प्रसन्न करणारे ठरू शकेल.
कुंभ : काही समस्या उद्भवू शकतील. रागावर नियंत्रण ठेवावे. घरामध्ये काही गोष्टीत तडजोड करावी लागेल. कामाच्या ठिकाणी पूर्ण लक्ष केंद्रित करा. आर्थिक व्यवहार करताना सावधिगिरी बाळगावी. हितशत्रूंच्या कारवाया त्रस्त करू शकतील. गाफील राहू नका. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा.
मीन : समस्यांचे निराकरण होईल. प्रवासात सावधगिरी बाळगावी. जोडीदाराशी उत्तम गप्पा रंगातील. मन:शांती लाभेल. वैवाहिक जीवनातील मतभेद दूर होऊ शकतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होऊ शकतील. मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची शक्यता. सावध राहावे.
Post a Comment