कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल? वाचा...

 


माय अहमदनगर वेब टीम

गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२०. चंद्र मीन राशीत विराजमान असेल. दिवसाच्या उत्तरार्धात रात्री चंद्र मेष राशीत प्रवेश करेल. सिंह आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी विशेष भाग्याचा दिवस ठरू शकेल. एकूण ग्रहमान पाहता तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? अन्य कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकेल? जाणून घ्या...

मेष : दिवस काहीसा आव्हानात्मक असेल. चिडचिड होऊ शकेल. आपले विचार ठामपणे मांडा. जुनी येणी मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्य किंवा मुलांच्या कृतीमुळे मन विचलित होईल. दुःख होऊ शकेल. इच्छा नसताना काही कामे करावी लागण्याची शक्यता. दिवसभरात काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. 

वृषभ : व्यवहाराचा योग्य ताळमेळ ठेवावा. एखादा महत्त्वाचा करार होऊ शकेल. याचा भविष्यात चांगला लाभ मिळेल. मित्रांच्या सल्ल्यावर विचार करा. केवळ स्वप्नात अडकून राहू नका. संमिश्र घटनांचा दिवस. घरातील काही महत्त्वांच्या गोष्टींचा आढावा घ्यावा लागेल. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल.

मिथुन : सामाजिक प्रतिमा उजळेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. अति धाडसी निर्णय घेणे टाळा. जोडीदाराशी चर्चा करून पुढे जा. दुपारनंतर आर्थिक आघाडीवर दिलासा मिळू शकेल. कार्यक्षेत्रात अपेक्षित नियोजित कामे पार न पडल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकेल. बहुतांश गोष्टींचे दोन अर्थ निघत असतात, हे ध्यानात ठेवून कार्यरत राहावे. सावधगिरी बाळगावी. 

कर्क : आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत. संयम व धैर्याने परिस्थिती हाताळावी. नोकरी व्यवसायात पटकन प्रतिक्रिया नोंदवू नका. सामाजिक प्रतिष्ठेला जपा. दिवसाची सुरुवात काहीशी प्रतिकूल असू शकेल. दिवसाचा उत्तरार्ध मात्र अनुकूल राहील. 

सिंह : जुनी प्रलंबित येणी मिळू शकतील. व्यवसायिकांना उत्तम लाभ होतील. मोठ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. नोकरीत मोठी जबाबदारी पडेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. एकूण दिवस अनुकूल असू शकेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने हाती घेतलेले काम उत्तमरित्या पार पडेल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून केवळ कार्यरत राहावे. 

कन्या : निजोजित कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. नवीन कार्यारंभास अनुकूल दिवस. अति आक्रमकतेने स्पर्धेत उतरू नका. नवीन संधी सापडतील. भाग्याची चांगली साथ लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. मित्रांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकेल. प्रलंबित कामे मार्गी लागू 

तुळ : स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळू शकेल. जनसंपर्कात भर पडेल. कार्य सिद्धीसाठी आपले सर्व पर्याय बरोबर राहतील. आजचा दिवस शुभ असेल. व्यवसाय, व्यापारी वर्गासाठी उत्तम दिवस. विशेष लाभ मिळू शकेल. नियोजित व प्रलंबित कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. यश व प्रगती साध्य होऊ शकेल. 

वृश्चिक : फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. शांततेने कार्यरत राहावे. वायफळ खर्चावर आवर घाला. खेळाडूंना उत्तम काळ. संमिश्र घटनांचा दिवस. नियोजित काम पूर्ण झाल्याने समाधान लाभेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या घटनेमुळे मन विचलित होऊ शकेल. धैर्य, संयमाने परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल. 

धनु : आनंदाची अनुभूती घ्याल. भविष्यातील योजनांवर काम कराल. अति शांतपणे विचार करून मग निर्णय घ्या. जुन्या विचारात अडकू नका. प्रलंबित कामांमुळे मन विचलित राहू शकेल. भाग्याची भक्कम साथ लाभेल. दुपारनंतर काहीशी धावपळ करावी लागू शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात काही लाभ मिळू शकतील. मन शांत आणि संयमित ठेवावे. 

मकर : एखादी महत्त्वाची माहिती मिळेल. प्रिय व्यक्तींकडून शुभवार्ता मिळतील. चारचौघात आपले कौतुक होईल. घरात कमी बोलून वाद टाळा. बौद्धिक क्षमता वाढवणारा दिवस. ज्येष्ठ व तज्ज्ञ व्यक्तींच्या भेटीचा योग जुळून येऊ शकेल. दिवसभरात काही ना काही लाभ मिळतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. 

कुंभ : प्रलंबित कामे प्राधान्याने मार्गी लावावीत. काही समस्यांना उद्भवू शकतील. संभ्रमित अवस्थेत दिशाभूल होऊ देऊ नका. बोलताना शब्द जपून वापरा. एखाद्या गोष्टीमुळे चिंतेत भर पडू शकेल. द्विधा मनःस्थिती होत असल्यास निर्णय घेण्यास घाई करू नये. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल ठरू शकेल. 

मीन : दिनक्रम व्यस्त राहू शकेल. महत्त्वाची कामे प्राधान्यक्रमाने करणे हिताचे ठरेल. आपल्या पराक्रमाचे कौतुक होईल. मोठ्या व्यक्तींचा मान ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. दुपारनंतर काही समस्यांना सामोरे जावे लागेल. मित्रांचा सल्ला मोलाचा ठरेल. संयमाने परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post