‘लागिरं झालं जी’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन

 


माय अहमदनगर वेब टीम

लागिरं झालं जी या मालिकेत जिजी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ऐन दिवाळीत त्यांचं निधन झाल्याने मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी कला क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका अशी कमल ठोके यांची ओळख होती. १४ नोव्हेंबरला बंगळुरू या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रसिद्ध मालिका लागिरं झालं जीमधून कमल ठोके यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. १४ नोव्हेंबरला संध्याकाळी बंगळुरु या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मराठी सिनेसृष्टीत जीजी अशी कमल ठोके यांची ओळख आहे. त्यांच्या पार्थिवावर कराड येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या जाण्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

श्रीमती कमल ठोके यांनी शिक्षकी पेशा सांभाळात अभिनय क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सासर माहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका होत्या. कमल ठोके यांच्या पश्चात मुलगा, सून नातवंडं, मुलगी असा परिवार आहे. लागिरं झालं जी या मालिकेतून त्या घराघरात पोहचल्या होत्या. जिजी या नावानेच त्या परिचितही झाल्या होत्या. देवमाणूस या मालिकेतही त्या काम करत होत्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post