शनैश्वर देवस्थान अध्यक्षपदी 'यांची' होऊ शकते निवड



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर-  नेवासा तालुक्यातील जगप्रसिद्ध श्री क्षेत्र शिगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची यादी आज बुधवार 23 रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालया कडून जाहीर करण्यात आली.

सहायक धर्मदाय आयुक्तांनी अर्जदार उमेदवारांच्या मुलाखती पुर्ण करुन सन २०२१ ते २०२५ साठी 11 विश्वस्तांची निवड जाहीर केली आहे.

नवीन विश्वस्त याप्रमाणे

शिवाजी आण्णासाहेब दरंदले, दिपक दादासाहेब दरंदले,शहाराम रावसाहेब दरंदले, विकास नानासाहेब बानकर,भागवत सोपान बानकर, अप्पासाहेब ज्ञानदेव शेटे,पोपट रामचंद्र शेटे,बाळासाहेब बन्सी बोरुडे, पोपट लक्ष्मण कु-हाट,छबुराव नामदेव भुतकर, सौ.सुनिता विठ्ठल आढाव आदींचा समावेश आहे.


यामध्ये माजी अध्यक्ष प्रा.शिवाजी दरंदले, माजी उपाध्यक्ष यांचे चिरंजीव भागवत सोपान बानकर यांचा समावेश आहे.तर माजी विश्वस्तपैकी दिपक दादासाहेब दरंदले, अप्पासाहेब ज्ञानदेव शेटे,पोपट रामचंद्र शेटे यांचा यामध्ये समावेश आहे. नवीन वर्षात नव्या विश्वस्त मंडळा च्या हाती कारभार जाणार आहे.

दरम्यान अध्यक्ष,उपाध्यक्ष, चिटणीस,कोषाध्यक्ष या महत्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्यासह राज्यातील शनिभक्ताचे लक्ष लागून आहे. यामध्ये दरंदले आडनावाचे 3, बानकर व शेटे आडनाव प्रत्येकी 2 तर अन्य स्थानिक चार आडनावाच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे.एकूण 84 प्राप्त अर्ज होते.त्यातून 11 जणांची निवड करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post