जमिनीच्या वादात असा झाला मर्डर




माय अहमदनगर वेब टीम

नेवासा - प्रतिनिधी गणेश मुळे तालुक्यातील भानसहिवरे येथे सख्या भावांमध्ये जमिनीच्या वाटणी वरून झालेल्या वादात एकाचा चाकू भोकसून खून केला . ही घटना रविवारी दुपारी भानसहिवरे येथे घडली . या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले .

या घटनेला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला . नय्यूम लतीफ देशमुख ( वय 50 ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे . अधिक माहिती अशी , भानसहिवरे येथील लतीफ देशमुख यांचे कय्यूम , नय्यूम , रफिक , मोईन व नदीम अशी पाच विवाहित मुलांपैकी कय्यूम हे गावात तर इतर चौघे नगर येथे राहतात . देशमुख यांची भानसहिवरे येथील ऐतिहासिक गढी परिसरात इनामाचे अडीच एकर शेत जमीन आहे . त्या जमिनीच्या वाटणीसंदर्भात आज शेतात आठ जणांची बैठक झाली . त्यात वादावादी होऊन एकाने नय्यूमवर चाकूने हल्ला केला . त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले . मात्र , उपचारा दरम्यान , त्यांचा मृत्यू झाला . या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले . शेवगावचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे म्हणाले , की पाच भावांमध्ये जमिनीच्या वाटण्यावरून वाद होता . त्या वादातून एकाचा खून झाला . पोलिस पुढील तपास करीत आहेत .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post