पतीचा खून ; पत्नीस 7 वर्षांनी बेड्या



माय अहमदनगर वेब टीम

शेवगाव - सप्टें २०१३ रोजी रात्री ०१-३० वा.चे सुमारास शेवगाव मधील शास्त्रीनगर येथे रामचंद्र उर्फ रामजी साहेबराव सातपुते यांना पिस्टलच्या दोन गोळया लागुन ते गंभीर जखमी होवुन मयत झाले होते.सदरबाबत शेवगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन मयताची पत्नी शांताबाई रामचंद्र उर्फ रामजी सातपुते हिचे विरुध्द दि.३०/१२/२०१७ रोजी शेवगांव पोलीस स्टेशनला भादंविक ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी केला.त्यामध्ये सदर गुन्हयातील आरोपी नामे श्रीमती.शांताबाई रामचंद्र उर्फ रामजी सातपुते (मयताची पत्नी)हिचेविरुध्द पुरावा मिळुन आल्याने तिला सदर गुन्हयाचे कामी  २३/१२/२०२० रोजी अटक करण्यात आली.तिला  २८/१२/२०२० पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा.श्री.मनोज पाटील, पोलीस अधीक्षक  अहमदनगर व मा.श्री.सौरभकुमार अग्रवाल,अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.सुदर्शन मुंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगांव उपविभागशेवगांव,पोहेकॉ.नितिन दराडे, पोना.संजय बडे,म.पो.कॉ. रोहिणी घरवाढवे करीत आहेत

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post