माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - अमेरिकेत करोना संसर्गाच्या थैमानादरम्यान प्रतिबंधक लसीचा पहिला डोस सोमवारी देण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाचं अभिनंदन करताना ट्विटद्वारे ही माहिती दिली. करोनाच्या संसर्गाने त्रस्त असलेल्या अमेरिकेत फायजरच्या लसीकरणाला मंजूरी देण्यात आली आहे.
अमेरिकेत देण्यात आलेला करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस एका नर्सला देण्यात आला आहे. यापूर्वी एफडीएद्वारे लसीला मंजुरी दिल्यानंतर लगेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका व्हिडिओद्वारे याची माहिती दिली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, “आज आमच्या देशात एक वैद्यकीय चमत्कार झाला आहे.
Post a Comment