विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोर्हे यांचे आयजींना पत्र
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर-
नगर जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठ्याप्रमाणात दरोड्यांचा प्रमाण वाढले आहे हे आटोक्यात आणण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करावं तसेच नगर नाशिक परिसरात नुकत्याच अटक झालेल्या बुवाप्रमाणे अनेक नावाने वावरणाऱ्या गुन्हेगाराने जमिनीतून सोने कडून देतो अशी फसवणूक करणाऱ्या बुवांच्या विरोधी कडक कारवाई करण्याची मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोर्हे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांना पत्र दिले आहे.
पत्रात उपसभापती गोर्हे यांनी म्हटले आहे की,
विषय क्र. १. *दरोड्यांतील आरोपांवर कडक कारवाई संदर्भात...*
अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, महिला अत्याचाराच्या प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोठेवाडी असो कोपर्डी येथील घटनांचा मागोवा घेतला तर अशा घटनांवर निर्बंध आणण्यासाठी पोलीस प्रशासनास विशेष प्रयत्न करणे आवश्यक वाटत आहे.
कालच दि.२० डिसेंबर, २०२० रोजी पहाटे श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा गावात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी विमल जाधव या ज्येष्ठ महिलेच्या घरातील ५० हजारांचा ऐवज चोरला. त्यांच्या कानातील दागिने खेचल्याने दोन्ही कानाच्या पाळ्या तुटल्या. यात जाधव आजी चांगल्याच जखमी झाल्या आहेत. घरात महादेव जाधव व विमल जाधव हे ज्येष्ठ दामप्त्य होते. सुरवातीला दरोडेखोरांनी घराची कडी वाजविली. प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा उघडण्यासाठी धमकावले. शेवटी दरवाजा उघडला गेला. दरोडेखोरांनी आत येताच विमल जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावू लागले. विमल यांनी कानातील दागिने काढून देण्यास विरोध केला. त्यामुळे दरोडेखोरांनी कानातील दागिने पकडून जोरात हिसकावले. त्यामुळे जाधव यांच्या कानाच्या दोन्ही पाळ्या तुटल्या. दरोडेखोरांनी कानातील आणि गळ्यातील दागिनेही हिसकावून नेले असल्याचे समोर आले आहे.
विषय क्र. २. *भोंदू बुवांकडुन फसवणूक संदर्भात*
जमिनीतून सोने काढून देतो, भरपूर धनलाभ करुन देण्याचे आमिष भक्तांना दाखवणार्या भोंदूबुवाला अखेर पोलिसांनी अटक केली.अशी अनेक नावे प्रचलित वापरुन फसवणूक करणार्या गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. तसेच असे बुवा महिलांना लवकर जाळ्यात ओढत असतात. त्यातून महिलांवर अत्याचार झालेले प्रकार आपण यापूर्वी देखील पाहिले आहे. असे असताना या बुवाने महिलांवर देखील अत्याचार केले आहेत का..? या संदर्भात पोलिसांनी महिलांना आवाहन करावी की या भोंदू व्यक्तीने जर कोणत्या महिलेवर अत्याचार केला असेल तर त्यांना पोलिसांना संपर्क करावा व त्यांची नावे गुपित ठेवण्यात यावे.
*प्रतिबंधात्मक कारवाई*
*दरोडेखीरीच्या अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी आपणास खालील सूचना करता आहे*
१. या दरोडेखोरांचा सतत वावर हा नाशिक, औरंगाबाद, नगर आणि बीड या जिल्ह्यात सुरू असतो. दरोड्यांच्या घटना भविष्यात घडू नये, दरोडेखोरांचा नायनाट करण्यासाठी नगर दरोडेखोर विरोधी जिल्ह्यात विशेष पोलीस पथकाची स्थापन करावी.
२. सदरील घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी पूर्वीच्या दरोड्यांच्या घटनांत आणि या घटनेत काय साम्य आहे याचा अभ्यास करावा जेणेकरून दरोड्यांच्या कार्यपध्दतीवरून आरोपींना अटक करण्यात मदत होईल.
३. दरोडेखोरांकडून गावाशेजारील वस्त्यांना लक्ष केले जात आहे. अशा वस्त्यांना गावाशी अथवा पोलीस स्थानकाशी जोडण्यासाठी विशेष उपयोजना करण्यात याव्यात.
४. समाजकंटक, दरोडेखोर यांना संरक्षण देणाऱ्या काही प्रवृत्ती सदरील जिल्ह्यात आहेत. दरोडेखोरांच्या मुळाशी जाऊन अशा समाजकंटकांवर देखील कारवाई होणे आवश्यक आहे.
आपली विश्वासु,
ना.डॉ.नीलम गोऱ्हे,
उपसभापती - विधानपरिषद,
महाराष्ट्र राज्य.
Post a Comment