माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर-सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. यानंतर परदेशी महिला असल्याचे भासवून 70 लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या नायजेरीयन नागरिकाला दिल्ली येथे पकडण्यात अहमदनगर सायबर पोलिसांना यश आले आहे. दिल्ली येथून अटक करण्यात आलेल्याचे इढूकेस्टर उर्फ इब्राहिम असे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्याला दि. 24 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पो.नि. अंबादास भुसारे यांच्या सूचनेनुसार पोसई प्रतीक कोळी, पोहेकाॅ योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोना मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, राहुल भुसाळे, विशाल अमृते, पोकाॅ अरुण सांगळे, मपोकाॅ पूजा भांगरे, पोकाॅ प्रशांत राठोड, गणेश पाटील, चापोहेकाँ वासुदेव शेलार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की रिझर्व बँक अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या इसमांनी व दिल्ली, वाराणसी, अरुणाचल प्रदेश येथील विविध बँकेचे सहा खातेदारांनी खोटी ओळख सांगितली. यानंतर मैत्री करून भारतातील हर्बल प्रोडक्ट कंपनीकडून आयुर्वेदिक कच्चामाल खरेदी करण्याचा बहाणा करून शासकीय कार्यालयाचे बनावट मेलद्वारे खोटी कागदपत्रे पाठवून एकूण 70 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या सायबर पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून भादावी 419, 420, 467, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या दाखल गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला असता गुन्ह्यातील संशयित आरोपी हा दिल्ली परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नगर सायबर पोलिस पथकाने दिल्ली येथे द्वारका आयानगर परिसरात सलग सात दिवस थांबले. आरोपी हा वेळोवेळी त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता. आरोपीची तांत्रिक तसेच स्थानिक पातळीवरील माहिती काढून आरोपी रहात असलेल्या दाट लोकवस्तीत असलेल्या भागात घराजवळ पाळत ठेवून संशयित आरोपी घरी येताच त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपी याला चांगलाच पोलीसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
Post a Comment