चौघांनी घरात घुसून महिलेवर केला सामूहिक बलात्कार



माय अहमदनगर वेब टीम

बस्ती: उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. दुबौलिया परिसरात चौघांनी एका घरात घुसून ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या पतीच्या हत्या करून मृतदेह 'गायब' केल्याचा आरोप पीडितेने या आरोपींवर केला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, १० डिसेंबर रोजी गावातीलच चार जण घरात घुसले आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यांना विरोध केला असता, जीवे मारण्याची धमकी दिली, असेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या तक्रारीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींवर महिलेने आणखी एक आरोप केला आहे. पतीची हत्या करून मृतदेह गायब केल्याची तक्रार तिने याआधीही या आरोपींविरोधात केली होती. त्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. सर्वांची जामिनावर सुटका झाली आहे. हे प्रकरण संशयास्पद असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post