माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - ग्रामपंचायत निवडणुकीत ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यात निवडणूक आयोगाने सूट दिली असून उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी ऑफलाईन भरता येणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. तसेच जुन्या बँक खात्यामधून निवडणूक खर्च करण्याची परवानगी दिली आहे.
त्याचबरोबर नवीन बँक खात्याची अट शिथिल केली असून आता उमेदवाराचे जुने खातेही ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज मंगळवारी दिले. यामुळे उमेदवारी अर्ज भरतांना येणार्या अडचणी दूर होवून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त दिवस उरला असतांना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरतांना अनेक अडचणी येत आहेत. या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरण्यास परवानगी दिली आहे. तसेच अर्ज भरण्याचा वेळ वाढवून तो सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत करण्यात आला आहे. यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Post a Comment