हेल्थ डेस्क - बॉलिवूड अभिनेत्रींचे सुंदर केस आणि त्वचा आपणा सर्वांनाच आकर्षित करतात. सेलिब्रिटी आपल्या त्वचेप्रमाणेच केसांचीही योग्य ती देखभाल करतात. बहुतांश अभिनेत्री आपल्या केसांवर हानिकारक हेअर प्रोडक्टचा वापर करणं टाळतात. केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अभिनेत्री सुद्धा घरगुती उपचारांची मदत घेतात.
दरम्यान कंगना राणौत ही बॉलिवूडमधील एकमेव अशी अभिनेत्री जिचे केस प्रचंड कुरळे आणि सुंदर आहेत. केसांची काळजी घेण्यासाठी ती आजीने सांगितलेले घरगुती-नैसर्गिक उपचार करते. अशाच कित्येक अभिनेत्री केसाच्या देखभालीसाठी बाजारातील महागडे हेअर केअर प्रोडक्ट वापरण्याऐवजी साधे-सोपे घरगुती उपायच करतात.
अनुष्का शर्मा
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या केसांचे नुकसान होऊ नये, यासाठी कोमट तेलाने मसाज करते. केसांना तेल लावल्याशिवाय ती शॅम्पूने हेअरवॉश करत नाही. नारळाच्या तेलाने मसाज केल्याने तिच्या टाळूची त्वचा निरोगी आणि केस मजबूत राहतात.
कतरिना कैफ
ही सुंदर अभिनेत्री आपल्या केसांचा फ्रुट ऑइलने मसाज करते. याव्यतिरिक्त नियमित हेअर स्पा आणि कंडिशनिंग करणं हे कतरिनाच्या सुंदर केसांचे रहस्य आहे.
प्रियंका चोप्रा
प्रियंका आपल्या केसांचे नुकसान होऊ नये, यासाठी साधेसोपे घरगुती उपाय करते. ‘दही’ हे या अभिनेत्रीच्या सुंदर केसांचे रहस्य आहे. अर्ध्या कप दह्यामध्ये दोन लिंबांचा रस मिक्स करून ती आपल्या टाळूच्या त्वचेवर लावते आणि ३० मिनिटांनंतर शॅम्पूने केस स्वच्छ करते. हा उपाय केल्यास केसांवर चमक येते.
करीना कपूर - खान
करीना कपूर महिन्यातून कमीत-कमी एकदा टाळूच्या त्वचेचा तेलाने मसाज करते. यासाठी ती एरंडेल तेल, ऑलिव्ह ऑइल, बदाम आणि नारळाच्या तेलाने मसाज करणं पसंत करते.
दीपिका पादुकोण
ही अभिनेत्री आपल्या केसांची विशेष काळजी घेते. केसांचे नुकसान टाळण्यासाठी दीपिका पादुकोण ऑइल मसाज करते. याव्यतिरिक्त हानिकारक रसायने आणि प्रदूषणापासून ती केसांचं संरक्षण करण्याचे काम करते.
आलिया भट
आलिया भट नियमित व्हिटॅमिन ए युक्त खाद्यपदार्थांचे सेवन करण्यावर भर देते. शॅम्पूच्या मदतीने नियमित केस स्वच्छ करते. यामुळे केसांमधील दुर्गंध दूर होण्यास मदत मिळते.
जॅकलीन फर्नांडिस
जॅकलीन आपले केस मजबूत आणि घनदाट करण्यासाठी अंड्याच्या हेअर मास्कचा वापर करते. याव्यतिरिक्त नारळाच्या तेलाने ती आपल्या केसांचा मसाजही करते.
कंगना राणौत
कंगना राणौत बॉलिवूडमधील एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिचे केस नैसर्गिक स्वरुपात कुरळे आहेत. ही अभिनेत्री आपल्या कुरळ्या केसांकडे स्टाइल स्टेटमेंटच्या स्वरुपात पाहते. आजीने दिलेल्या सल्ल्यानुसार कंगना आठवड्यातून तीन वेळा केसांना तेल लावून गरम पाण्याची वाफ देते. तुम्ही देखील सुंदर, घनदाट आणि काळेशार केस मिळवण्यसाठी घरगुती उपचारांची मदत घेऊ शकता
NOTE केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच दुसऱ्या व्यक्तीचे हेअर केअर रुटीन फॉलो करू नये. कारण प्रत्येकाच्या केसाचा प्रकार वेगळा असतो.
Post a Comment