राज्यात हुडहुडी

 


माय अहमदनगर वेब टीम

 मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पण ढगाळ वातावरणामुळे राज्यात फारशी थंडी जाणावली नाही. पण आता उत्तर भारतातून थंडीचा तडाखा महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यात कडाक्याची थंडी पाहायला मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढणार आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे

आता उत्तरेकडून राज्यात थंड वाऱ्याचा प्रवाह वाहू लागला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत चांगलाच गारठा वाढल्याचं पाहायला मिळतं. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ लागली आहे. या कोरड्या वातावरणामुळे नववर्षाच्या सुरुवातीला राज्यात चांगलीच थंडी पाहायला मिळणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post