महावितरणच्या भोंगळ कारभाराने घेतला कंत्राटी वीज कामगाराचा बळी!




नातेवाईकांनी मृृृतदेहासह केले महावितरणच्या दारात आंदोलन!

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - नगर तालुक्यातल्या खडकी येथील एमएससीबीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने मुत्यू झाला. घटना बाबुर्डी बेंद येथे सकाळी दहा वाजता ही घडली. दरम्यान,  या कंत्राटी कामगाराला पन्नास लाख रुपयांची मदत मिळावी, या मागणीसाठी एमएससीबीच्या कार्यालयाजवळ मृतदेह ठेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात जोपर्यंत अश्वासन देत नाही, तोपर्यत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका यावेळी नातेवाईकांनी घेतली.

रुपेश सुखदेव बहिरट ( वय -२६, रा. खडकी, ता. नगर) असे मयत कंत्राटी कर्मचार्‍याचं नाव असून चार महिन्यापूर्वी लग्न झाले होते.

बाबुडी बेंद (ता. नगर) येथे वीजेचा तांत्रीक बिघाड झाला होता. या भागात काम करणारे वायरमन यांनी रूपेश बहिरट याला वीजेच्या पोलवर जाण्यासाठी सांगितले. त्यावेळी वीजप्रवााह सुुरु असल्यामुुळे शॉक बसून पोलवरून तो खाली पडला, त्याचा जागीच मुत्यू आला.

अधिकाऱ्यांनी बळजबरीने बाहिरट यांना पोलवर चढण्यासाठी सांगीतले. बहिरट यांच्याकडे हे गाव नसताना काम करण्यास सांगितले. पोलवर जाण्याचे काम वायरमनचे असते.

मात्र याला कोणत्या अधिकारात पोलवर चढवयात आले. जोपर्यत बहिरट यांच्या कुंटुबाला मदत मिळण्याचे आश्वासन देत नाही,  तोपर्यत इथून जाणार नाही, असे हराळ यांनी यावेळी सांगीतले.

यावेळी अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, जि.प. सदस्य संदेश कार्ले, माजी सभापती रामदास भोर, बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, दिलीप भालसिंग, शरद बोठे, जनाधन माने, प्रवीण कोठुळे, ग्रामपंचायत सदस्य महेश कोठुळे, अरुण कापसे, सुधीर भापकर सह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

सायंकाळी उशिरा खडकी येथील स्मशानभूमीत रुपेश वर अंत्यसंस्कार करण्यात आले. युवकाचा नाहक बळी गेल्याने ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post