'या' कारणामुळे राष्ट्रवादीत धुसफूस?



माय अहमदनगर वेब टीम

जळगाव: जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांनी शुक्रवारी जळगाव येथे पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आज दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून प्रफुल्ल लोढा राष्ट्रवादी काँग्रेसचे साधे सदस्य देखील नसल्याने त्यांचा पक्षाची संबध नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, खडसे यांना राजकीय द्वेषातून ईडीची नोटीस पाठविण्यात आली असल्याचा आरोप देखील रविंद्र पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे सांगत जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांनी शुक्रवरी जळगावात पत्रकार परिषद घेवून भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते. गिरीश महाजन यांच्या गैरकृत्याची फाइल शोधण्यासाठी खडसे यांच्या सांगण्यावरूनच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माझ्या व मित्राच्या घराची झडती घेतल्याचा आरोप करीत लोढा यांनी खडसे गलिच्छ राजकारण करीत असल्याची टीका केली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post