माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगर अर्बन बँकेची सार्वत्रिक निवडणूक घ्यावी मागणीचे निवेदन शाखाधिकारी यांना देऊन हे निवेदन नवी दिल्ली येथील सहकार विभागाच्या केंद्रीय निबंधकांना पाठविण्यात आले आहे. नगर अर्बन बँकेची सार्वत्रिक निवडणूक २०१९मध्ये होणार होती. मात्र बँकेवर प्रशासक नेमले गेल्याने बँकेची निवडणूक लांबणीवर गेली असल्याने मल्टी कॉपरेटिव्ही सोसायटीच्या २००२ च्या कायद्यानुसार नगर अर्बन बँकेची निवडणूक तातडीने घ्यावी अशी मागणी बँकेच्या सभासद शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे बँकेचे शाखाधिकारी गणेश कानडे यांच्याकडे केली.
सदर मागणीचे निवेदन नवी दिल्ली येथील सहकार विभागाच्या केंद्रीय निबंधकांना पाठविण्यात आले आहे. नगर अर्बन बँकेची स्थापना १९१० साली झालेली असून या बँकेने ११० वर्षात विकासाची मोठी उंची गाठली आहे. परंतु सध्या प्रशासक नेमल्याने बँकेची प्रगती खुंटली आहे. त्यामुळे बँकेच्या सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार यांनी बँकेची तातडीने निवडणूक घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी निवेदन देताना अल्लाउद्दीन काझी, अशोक खेडकर, सचिन पोटरे, विनोद दळवी, अल्ताफ शेख, इनायत पठाण, तन्वीर पठाण आदी उपस्थित होते.
Post a Comment