'या' तालुक्यात 1929 जणांना व्हायचंय मेंबर



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नगर तालुक्यात आज अखेर एकुण १ हजार ९२९ अर्ज प्राप्त झाले आहेत.नगर तालुक्यातील आंबिलवाडी  व वारूळवाडी बिनविरोध वर शिक्कामोर्तब झाले आहे. निंबळक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वाधिक ९२ अर्ज दाखल झाले आहेत. नवनागापूर ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची चर्चा होती पण याठिकाणी ६९ अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय दरेवाडी ( ९१),  चिचोंडी पाटील ( ७३ ), देहरे .( ६२ ),जेऊर ( ५९ )विळद ( ५९ अर्ज दाखल झाले आहेत. तर  दश्मीगव्हाण मधील ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post