पंकजा मुंडे विलगीकरणात, ट्वीट करत दिली माहिती

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. प्रचारानंतर पंकजा मुंडे या स्वत: विलगीकरणात गेल्या आहेत. त्यांनी रात्री उशिरा यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली.

“पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांनी ट्वीट करत रात्री उशिरा यासंदर्भातील माहिती दिली आहे.

वर्षपूर्तीनिमित्त सरकारवर साधला होता निशाणा

“एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्वात प्रथम मी सरकारचं अभिनंदन करते. एक वर्ष पूर्ण होतं की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रम होता. जनतेने बहुमत दिलेलं नसतानाही ते सत्तेत आहेत. त्यामुळे सत्ता टिकवणं हे त्यांचं ध्येय आहे असं मला वाटतं. जनतेचे हित दुय्यम अशी परिस्थिती आहे,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. “करोनाचा सामना करणं सरकारसमोर आव्हान आहे. सरकारसाठी हे नक्कीच त्रासदायक आहे. जनहितासठी आम्ही सहकार्याची भूमिका नक्की ठेवू,” असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलं होतं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post