रात्री झोपण्यापूर्वी २ मिनिटे चेहऱ्याचा 'या' नैसर्गिक तेलाने करा मसाज, त्वचेमध्ये दिसतील असे बदल

 


माय अहमदनगर वेब टीम

हेेल्थ डेस्क - बाजारात उपलब्ध असणारे अँटी एजिंग सीरम आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतीलच, असे नाही. कारण कधी-कधी कळत नकळत आपणच त्वचेचा प्रकार जाणून न घेता ब्युटी प्रोडक्ट खरेदी करतो. यामुळे आपल्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात. तसंच शक्यतो चेहऱ्यासाठी केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट वापरणं टाळावं. हिवाळ्यामध्ये त्वचेचं संरक्षण करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे नारळाचे तेल. या तेलाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्वचेला भरपूर लाभ मिळू शकतात.

नारळ तेलाच्या मदतीने आपण घरच्या घरी अँटी एजिंग मसाज ऑइल तयार करू शकता. या तेलामध्ये अन्य नैसर्गिक सामग्रींचा समावेश केल्यास तुम्हाला चेहऱ्यावर सकारात्मक बदल पाहायला मिळतील. रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने चेहऱ्याचा दोन मिनिटासाठी मसाज केल्यास चेहऱ्याची त्वचा सैल पडणार नाही तसंच त्वचेवर नैसर्गिक चमक देखील येईल. चला तर जाणून घेऊया तेल तयार करण्याची रेसिपी...

सामग्री

नारळाचे तेल : एक वाटी

गुलाबाच्या पाकळ्या : सात ते आठ

गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या : दोन चमचे

कच्चे तांदूळ : दोन छोटे चमचे

लवंग : पाच ते सहा

ग्रीन टी : अर्धा चमचा

तेल तयार करण्याची पद्धत

सर्वप्रथम एका काचेच्या जारमध्ये नारळाचे तेल ओता. तेलामध्ये एक- एक करून सर्व सामग्री मिक्स करा. सर्व सामग्री नीट एकजीव करून घ्या. तयार झाले आहे तुमचे नैसर्गिक फेस सीरम.

नारळाचे तेल

वाढत्या वयोमानानुसार आपल्या त्वचेमध्ये भरपूर बदल होतात. यामध्ये त्वचा सैल पडणे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येणे ही प्रमुख लक्षणे आहेत. पण नारळाच्या तेलाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळेल. या तेलातील औषधी गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. कारण यामधील लॉरिक अ‍ॅसिड कोलेजनच्या उत्पादनासाठी लाभदायक असते. ज्यामुळे त्वचा सैल पडत नाही.

​गुलाबाच्या पाकळ्या

गुलाबाच्या पाकळ्यांमुळे आपल्या त्वचेचं टोन सुधारण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त त्वचेचा रंग देखील उजळतो. मऊ आणि नितळ त्वचेसाठी गुलाबाच्या पाकळ्या लाभदायक आहेत.

लवंग

लवंगाच्या तेलामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत, जे मृत त्वचेची समस्या दूर करतात. शिवाय त्वचेच्या भागातील रक्तप्रवाह देखील वाढतो. यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येत

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये ईजीसीजी नावाचे एक प्रभावी अँटी ऑक्सिडंट आहे. जे त्वचेचा कर्करोग रोखण्यासाठी अतिनील किरणांविरोधात लढण्यास शरीराची मदत करतात. म्हणजेच ग्रीन टीमधील अँटी एजिंग घटक वृद्धत्वाच्या लक्षणांविरोधात लढण्याचे कार्य करतात.

तांदूळ

जपानमध्ये हजारो वर्षांपासून तांदळाचा नैसर्गिक सौंदर्य उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आपली त्वचा मऊ आणि नितळ राहावी, यासाठी जपानमधील महिला तांदळाचा आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये समावेश करतात.

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post