झेपेल तितकंच बोला; 'या' तरुण मंत्र्याचा भाजप नेत्यांना टोला

 


माय अहमदनगर वेब टीम

नगर: 'राज्यातील भाजप नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं,' असा सल्लाच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. उगाच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याच्या फंदात कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण कराल, असा टोलाही तनपुरे यांनी भाजप नेत्यांना लगावला.

पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी १ डिसेंबरला निवडणूक झाली होती. या निवडणुकीचे निकाल हाती आले असून यामध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड ठरले आहे. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. आता निवडणुकीतील विजयानंतर ' महाविकास आघाडी 'च्या नेत्यांकडून भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले जात आहेत. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यमंत्री तनपुरे यांनीही ट्वीट करीत भाजपवर निशाणा साधला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post