माय अहमदनगर वेब टीम
गुरुवार, ०३ डिसेंबर २०२०. चंद्र मिथुन राशीत विराजमान असेल. चंद्र आणि शुक्रचा नवम पंचम योग जुळून येत आहे. या योगाचा मिथुन आणि वृषभ राशीच्या व्यक्तींना उत्तम फायदा मिळू शकेल. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया...
आजचे मराठी पंचांग : गुरुवार, ०३ डिसेंबर २०२०
मेष : वाट पाहात असलेल्या निर्णयांचा निकाल लागेल. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आजचा दिवस संमिश्र असू शकेल. ग्रहांची अनुकूलता लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. आध्यात्मिक आवड वाढेल. शुभ व्यय कीर्ती वृद्धिंगत करेल. मुलांकडून शुभवार्ता मिळू शकेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल.
वृषभ : कौटुंबिक चर्चा रंगतील. सामाजिक क्षेत्रात आपल्याविरुद्ध बोलायला संधी देऊ नका. आजचा दिवस शुभफलदायी ठरू शकेल. मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. चंद्राची शुभदशा लाभदायक ठरू शकेल. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन, सल्ला मोलाचा ठरू शकेल. उत्तम संधी उपलब्ध होतील. संधीचा लाभ घेण्यासाठी सजग राहावे.
मिथुन : गडबडून जाण्याचे काही कारण नाही. शांतपणे निर्णय घ्या. भाग्याची उत्तम साथ लाभेल. हितशत्रूंच्या कारवायांपासून सावध राहावे. विनाकारण चिंतेत भर पडेल. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. व्यवसायिकांनी सावधगिरी बाळगण्याचा दिवस. जोखमी न पत्करणे हिताचे ठरेल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल.
कर्क : आपल्या मतावर ठाम रहा. गृहसौख्य उत्तम लाभेल. ग्रहांच्या अनुकूलतेचे उत्तम पाठबळ मिळेल. भाग्याची साथ लाभेल. तणावमुक्तीचा दिवस ठरू शकेल. पराक्रमात वाढ होईल. न्यायालयीन प्रकरणात सकारात्मक वार्ता मिळेल. मन प्रसन्न राहील. जोडीदाराकडून लाभ मिळू शकेल. मानसिक शांतता लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला असेल.
सिंह : घरातील लोकांचे गैरसमज दूर करा. मेहनत करून यश पदरात पाडून घ्या. नवीन अज्ञात स्रोतांतून धनप्राप्तीचे योग जुळून येऊ शकतील. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. धनसंचय वृद्धिंगत होऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात शुभवार्ता मिळतील. मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल.
कन्या : व्यवसायात कामासाठी फिरावे लागेल. सुवर्णसंधी सापडतील. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस ठरू शकेल. मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा दिवस. धनलाभामुळे मनोबल वृद्धिंगत होईल. भाग्याची भक्कम साथ लाभेल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. हितशत्रू, विरोधक पराभूत होतील.
तुळ : अडकलेले पैसे पुन्हा परत मिळतील. अकारण बोलण्यात बढाया मारू नका. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम यशकारक दिवस. भौतिक सुखाचा आनंद घेऊ शकाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मित्र आणि आप्तेष्टांचे उत्तम सहकार्य लाभेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. येणी वसूल होऊ शकतील. महत्त्वाच्या कामांना गती मिळू शकेल.
वृश्चिक : विद्यार्थ्यांना अभ्यासामुळे उत्तम लाभ घडतील. नवीन नोकरीचे संकेत समजतील. आजचा दिनक्रम व्यस्त राहू शकेल. तणावमुक्तीमुळे मानसिक शांतता लाभेल. विवेक आणि सारासार विचाराने निर्णय घेणे हितकारक ठरेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. विनाकारणचे वाद टाळावेत. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
धनु : जोडीदाराच्या मानसिकतेचा आधार मिळवा. भागीदारी व्यवसायात निर्णय घेताना घाई करू नका. भाग्याची उत्तम साथ लाभेल. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. छोटे प्रवास घडतील. शुभवार्ता मिळतील. मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत पर्यटनाच्या योजना आखाल.
मकर : नोकरीच्या कामात बदल दिसून येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. आजचा दिवस शुभफलकारक ठरू शकेल. आपला इतरांवर प्रभाव राहील. जमीन, जायदाद यातून अनपेक्षितरित्या लाभ मिळण्याचे प्रबळ योग जुळून येऊ शकतील. एखाद्या प्रसंगामुळे मन विचलित होऊ शकेल. मनाचा कौल घेऊन निर्णय घेणे हिताचे ठरेल. समस्येचे निराकरण होऊ शकेल.
कुंभ : सरकारी कामे लवकर मार्गी लागतील. प्रलंबित विवाह ठरतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. मन प्रसन्न राहील. सुख, समृद्धी वृद्धिंगत होईल. चंद्राच्या कृपादृष्टीमुळे लाभ द्विगुणित होऊ शकतील. हितशत्रू, विरोधक नामोहरम होतील. एखाद्या कामामुळे दुप्पट नफा मिळण्याची शक्यता. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल.
मीन : घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आपल्या हट्टीपणाला मुरड घाला. भाग्याच्या अनुकूलतेमुळे उत्तम संपत्तीचा लाभ मिळू शकेल. येणी वसूल होऊ शकतील. समस्येचे निराकरण होऊ शकेल. समाधान मिळेल. विशेष काम सिद्धिस जाऊ शकेल. एखाद्या गोष्टीमुळे मन
Post a Comment