रेखा जर हत्या ... न्याय मिळेपर्यंत आम्ही लढणार



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : रेखा जरे  हत्या कांडातील तपासाला गती मिळावी मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे समाजातील अश्या प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी  जरे कुटुंबियांच्या पुढाकाराने  हा कँडल मार्च काढण्यात आला आहे. अश्या प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर छाप  बसायला हवा कारण अश्या प्रवृत्तीची माणसं  वेगवेगळ्या क्षेत्रात असतात. रेखा जरे  यांचा सामाजिक उपक्रमात नेहमी सहभाग असायचा त्यांना न्याय मिळे पर्यंत आपण लढत राहू असे आमदार संग्राम जगताप कँडल मार्च च्या समारोप प्रसंगी बोलतांना म्हणाले. 


या कँडल मार्चच्या वेळी स्नेहालय चे गिरीश कुलकर्णी,जनाधार संघटनेचे प्रकाश पोटे,फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर,मठ - मंदिर समितीचे अध्यक्ष हरिभाऊ डोळसे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन निगडे,तृतीय पंथीयांच्या संघटनेचे काजल गुरु,अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान,नलिनी गायकवाड, बागडे,मंगल भुजबळ,आदी उपस्थित होते. 


अशा घटना घडल्या कि समाज शांत पणे पाहत राहतो.आपल्या  कुटुंबात असे घडल्यास आपण शांत बसतो का? अशा प्रवृत्तीच्या विरोधात निषेध करायला हवा. विरोधाचा आवाज दाबला जातो तो प्रकट झाला पाहिजे. प्रत्येकाने आपली भूमिका मांडली पाहिजे असे स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी म्हणाले.  



हा संघर्ष आजचा नाही बाळ बोठे काम करत असलेल्या वर्तमानपत्राच्या महिला विषयक पुरवण्यांमध्ये मजकूर छापताना देखील त्यांचा महिलांशी संपर्क यायचा त्याही वेळी त्यांच्या स्त्री लंपट पणाला बऱ्याच महिला बळी पडल्या आहेत. त्यांच्या कारनाम्याला चाप बसणे गरजेचेच होते.असे देवीदास खेडकर म्हणाले. 


जे कोणी आपलं ऐकत नाहीत त्यांना निरनिराळ्या गुन्ह्यात अडकवून त्रास दिला जायचा मलाही त्यांच्या मुळेच नौकरी गमवावी लागली. अश्या प्रवृतींमुळे महिलांनी सामाजिक चळवळीत काम करावे कि नाही असा प्रश्न पडतो असे मंगल भुजबळ म्हणाल्या.   


रेखा जरे यांना श्रद्धांजली वाहून या कँडल मार्चचा समारोप करण्यात आला 


 रेखा जरे या पिडीत महिलांच्या मदतीला धावून जायच्या ,कोपरडीतील निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता ,मात्र आज त्यांचीच हत्या झाल्यानंतर  सारे काही शांत झाल्यासारखे वाटते. मात्र बाळ बोठेला तात्काळ अटक करून रेखा जरे यांना न्याय मिळायला हवा अशी आर्त विनवणी रेखा जरे यांची भावजय वायकर यांनी माध्यमांशी बोलताना केली तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी तरळले.


भिंगारवाला चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या  पर्यंत शहरातील सामाजिक संघटनांनी कॅण्डल मार्च काढला . या कॅण्डलमार्च मध्ये जरे यांचे छायाचित्र  आणि फलक घेऊन महिला मोठ्या प्रमाणात  सहभागी झाल्या  होत्या . त्याचबरोबर सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी गिरीश कुलकर्णी , रेखा ज़रे यांचा मुलगा  कुणाल जरे ,भावजय वायकर आदी सहभागी झाले होते.      

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post