शरद पवार कडाडले... म्हणाले...



माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर कृषी कायद्यांवरुन जोरदार हल्लाबोल केला. राज्यांशी कुठलीही चर्चा न करता सरकारने हे कायदे रेटून नेले असा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर दिल्लीत बसून शेती करता येत नाही, असा टोलाही पवार यांनी केंद्र सरकारला लगावला. पीटीआयशी ते बोलत होते.

पवार म्हणाले, “शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जबाबदार धरत केंद्र सरकार विरोधकांवर टीका करत आहे, जे चुकीचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं हे आंदोलन गांभीर्यानं घ्यायला हवं. गावांमध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जायला हवं, केवळ दिल्लीत बसून शेती करता येत नाही. राज्य सरकारांची या विषयासंबंधीची मोठी जबाबदारी आहे, त्यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे. युपीएच्या कार्यकाळात माझं आणि केंद्र सरकारचं कर्तव्य होतं की राज्याच्या कृषीमंत्र्यांना विश्वासात घेऊन पुढे जाण्यापूर्वी त्यांच्या अडचणी सोडवाव्यात.”

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post